Next
‘लेक माझी लाडकी’चा महाएपिसोड २९ जुलैला
प्रेस रिलीज
Friday, July 27, 2018 | 03:24 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘लेक माझी लाडकी’ मालिकेमध्ये लवकरच बारशाचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले असून या मालिकेचा महाएपिसोड २९ जुलै रोजी रंगणार आहे. या भागातून प्रेक्षकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडणार आहेत.

हा महाएपिसोड २९ जुलैला दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता दाखवला जाणार आहे. मालिकेमध्ये बाळाचे नाव काय ठेवायचे याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे; मात्र याच कार्यक्रमात इरावतीसमोर एक सत्य उघड होणार आहे. ज्या बाळाचे इतके कौतुक होत आहे ते बाळ सानिकाचे नसल्याचे धक्कादायक वास्तव इरावतीसमोर येणार आहे. हे बाळ नेमके कुणाचे आहे, सानिकापासून हे सत्य का लपवण्यात आले, मीराचा या सर्वाशी काय संबंध आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर महाएपिसोडच्या भागात उलगडणार आहेत.

अत्यंत भावनिक असा हा महाएपिसोड असणार आहे. प्रत्येक आईसाठी तिचे बाळ हे तिचा प्राण असतो. ज्या बाळासाठी सानिकाने असंख्य स्वप्न रंगवली होती ते बाळ आपले नाही हे सत्य सानिकासमोर येईल का, ती या सत्याचा स्वीकार कसा करेल, हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search