Next
‘संत निरंकारी चॅरिटेबल’तर्फे पुण्यात रक्तदान शिबिर
प्रेस रिलीज
Friday, April 26, 2019 | 01:44 PM
15 0 0
Share this article:


पुणे : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या येथील झोनतर्फे संत निरंकारी सत्संग भवन येथे २४ एप्रिल २०१९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी यांनी एक हजार २५८ युनिट रक्त संकलन केले.

या शिबिराचे उद्घाटन मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, पोलीस अधीक्षक (येरवडा पुनर्वसन विभाग) यू. टी. पवार, मुकुल माधव फाउंडेशनच्या रितू छाब्रिया, आमदार माधुरी मिसाळ, बी. जे. मेडिकल कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता मुरलीधर तांबे, सामाजिक न्याय व कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे या मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक, राजकीय, शासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली.


फाउंडेशनतर्फे नोव्हेंबर १९८६मध्ये पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराची सुरुवात केली होती. १९८७पासून हे शिबिर २४ एप्रिल या दिवशी मानव एकता दिवसानिमित्त आयोजित केले जात आहे. या शिबिराला प्रत्येक वर्षी मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

१९८६पासून आतापर्यंत सहा हजार ७६ शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, १० लाखांहून अधिक युनिट रक्त गोळा करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत २२ शिबिरे घेण्यात आली. त्यातून सात हजार ७ युनिट रक्त गोळा करण्यात आले. या वर्षी पुण्यात २८ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.


रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी पथनाट्य, रॅलीचे आयोजन पुणे परिसरात केले होते. शिबिरात आलेल्या सर्व मान्यवरांचे संत निरंकारी मंडळाच्या पुणे झोनचे प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुणे झोनमधील संयोजक, मुखी, सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search