Next
‘महायुती’कडून राजेंद्र गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रेस रिलीज
Friday, April 05, 2019 | 01:31 PM
15 0 0
Share this article:



पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी हजारो कार्यकर्ते आणि मतदारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पाचबत्ती ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान यानिमित्ताने महायुतीचा भव्य रोड शो आयोजित केला होता.

शिवसेना व ‘भाजप’चे झेंडे आणि ढोल-ताश्यांच्या गजरात ही मिरवणूक मोठ्या उत्साहाने निघाली. गावित यांच्या समर्थनार्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, ‘भाजप’चे नेते विनोद तावडे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, आमदार पास्कल धनारे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, श्रीनिवास वनगा, ज्योती ठाकरे, पालघर जिल्हा संघटक ज्योती मेहेर, ‘रिपाई’चे सुरेश जाधव, शिवसेना पदाधिकारी विलास जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पालघर मतदारसंघात मतदानाच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होत असून, या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search