Next
डॉ. शरदिनी डहाणूकर
BOI
Tuesday, October 17 | 04:00 AM
15 0 0
Share this story

अॅलोपॅथीत ‘एमडी’ होऊन, नंतर आयुर्वेदाचा अभ्यास करून त्यात पीएचडी मिळवून वनौषधींवर विशेष संशोधन करून त्यावर सोप्या भाषेत पुस्तकं लिहिणं ही घटना दुर्मीळच. ती साध्य करणाऱ्या डॉक्टर शरदिनी अरुण डहाणूकर यांचा १७ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...... 
शरदिनी अरुण डहाणूकर

१७ ऑक्टोबर १९४५ रोजी मुंबईत जन्मलेल्या शरदिनी डहाणूकर या अॅलोपॅथीच्या एमडी; पण तरीही त्यांनी वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदाचा विशेष अभ्यास केला होता. त्यातच त्यांनी पुढे पीएचडीसुद्धा मिळवली. 

त्यांच्या पुढाकाराने केईएम हॉस्पिटल, तसंच नायर हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदासंबंधी विशेष संशोधन विभागाची सुरुवात झाली. त्या ठिकाणी वनौषधींवर आणि आयुर्वेदीय उपचार पद्धतींवर संशोधन केलं जातं. आयुर्वेद आणि औषधविज्ञान शास्त्राच्या चिकित्सक संशोधक असा त्यांचा लौकिक होता. त्यांना वनस्पतींचं आणि त्यापासून बनणाऱ्या औषधांचं उत्तम ज्ञान होतं. 

अमेरिकेत गेल्या असताना तिथे भेटलेल्या सुनंदा आणि अशोक या भावंडांशी झालेल्या चर्चेतून त्यांना आयुर्वेदाविषयी कुतूहल वाटायला लागलं आणि त्यांच्या मुलीलाच जेव्हा खोकल्याच्या त्रासानं ग्रासलं आणि आयुर्वेदीय उपचारांनी त्वरित आराम मिळाला, तेव्हा त्या आयुर्वेदाकडे ओढल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी वैद्य भावंडांच्या वडिलांकडे, म्हणजे प्रख्यात वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्याकडे आयुर्वेदाचं ज्ञान घेतलं. पुढे आयुर्वेदाचं तत्त्वज्ञान आणि त्यातली उपचारपद्धती याबाबत सुबोध मांडणी केलेलं ‘स्वास्थ्यवृत्त’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि ते प्रचंड लोकप्रिय झालं.   

हिरवाई, फुलवा, वृक्षगान, पांचाळीची थाळी, सगेसोबती, नक्षत्रवृक्ष, मनस्मरणीचे मणी, अशी त्यांनी विविध विषयांवर लिहिलेली पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

(बुकगंगावरून त्यांची पुस्तकं मिळवण्याकरता येथे क्लिक करा). 

त्यांना महिला गौरव आणि वनिता समाज गौरव पुरस्कार मिळाले होते. 

४ ऑगस्ट २००२ रोजी त्यांचं निधन झालं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link