Next
‘ससूनच्या आधुनिकीकरणासाठी ‘सीएसआर’ महत्त्वपूर्ण’
प्रेस रिलीज
Friday, March 09, 2018 | 06:41 PM
15 0 0
Share this article:

एन्डोस्कोपी केंद्राचे उद्घाटन करताना चंद्रकांत दळवी, डॉ. फिलिप अब्राहिम, रितू छाब्रिया व इतर.

पुणे : ‘ससूनसारख्या सरकारी रुग्णालयातून गरीब रुग्णांना आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निधीबरोबरच सामाजिक आणि उद्योग संस्थांच्या सीएसआरचा महत्वाचा वाटा आहे. मुकुल माधव फाउंडेशनसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन ससूनमधील आरोग्य सुविधा अधिक सक्षम कराव्यात,’ असे प्रतिपादन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने एक कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पचनसंस्थाविकार निदान व उपचार केंद्राचे (एन्डोस्कोपी युनिट) आणि रुग्णाच्या नातेवाईकांसाठी सर्व सुविधांनी युक्त प्रतीक्षा कक्षाचे उद्घाटन व लोकार्पण चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले. ‘मोहिनी व प्रल्हाद छाब्रिया’ यांच्या स्मरणार्थ हे केंद्र आणि प्रतीक्षा कक्षा उभारण्यात आले आहेत. या वेळी  हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. फिलिप अब्राहिम, लंडन येथील रॉयल कॉलेजचे डॉ. अरविंद शहा, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका रितू प्रकाश छाब्रिया, प्रकाश छाब्रिया, ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉ. शशीकला सांगळे, डॉ. शीतल महाजन, डॉ. हरीश टाटिया, विनोद रोहानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

एन्डोस्कोपी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत दळवी यांचा सत्कार करताना डॉ. अजय चंदनवाले, डॉ. प्रकाश छाब्रिया, डॉ. फिलिप अब्राहिम, रितू छाब्रिया व इतर.
चंद्रकांत दळवी म्हणाले, ‘मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या या एन्डोस्कोपी युनिटमुळे अनेक गरजू रुग्णांवर अल्प दरात उपचार शक्य होणार आहेत. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या प्रयत्नातून गेल्या काही वर्षात ससून अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे. अनेक संस्था येथे आर्थिक सहकार्य करीत आहेत. शासकीय रुग्णालयांद्वारे  गरजू रुग्णांना अधिक लाभ होण्यासाठी या रुग्णालयांचे आधुनिकीकरण गरजेचे आहे. मुकुल माधव फाउंडेशनसारख्या पुण्यातील आणि आजूबाजूच्या कंपन्या आणि संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा.’

डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘एन्डोस्कोपी केंद्रात एंडोस्कोपिक रिट्रोग्रेट कोलनजीओ पॅनक्रीटोग्राफी (ईआरसीपी) हे अत्याधुनिक उपकरण बसविण्यात आले आहे. या तपासणीद्वारे खडा (स्टोन), ट्युमर यामुळे होणारे ब्लॉकेज तपासता येईल. या केंद्रामुळे तपासणी आणि उपचाराचे दिवस वाढणार असून, जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाला आयकर खात्याची ८० जी ची सुविधा मिळाल्याने सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी ससूनच्या रुग्णाभिमुख विकासाला हातभार लावावा.’

प्रतीक्षा कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. अजय चंदनवाले, प्रकाश छाब्रिया, डॉ. फिलिप अब्राहिम, रितू छाब्रिया व इतर.
रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, ‘आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या रुग्णांनाही एन्डोस्कोपी उपचार मिळावेत, या हेतूने फाउंडेशनने या केंद्राचे आधुनिकीकरण केले आहे. ससूनमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी नऊ ठिकाणी प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहेत. त्यातील बाल रुग्ण विभागाजवळील पहिल्या प्रतीक्षा कक्षाचे लोकार्पण झाले. येत्या काळातही ससूनच्या विविध विभागांच्या आधुनिकीकरणात मुकुल माधव फाउंडेशन सहकार्य करणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search