Next
नवमातांकडून पोषण आहाराकडे दुर्लक्ष
BOI
Tuesday, September 04 | 12:50 PM
15 0 0
Share this story

पुणे : नव्याने प्रसूती झालेल्या मातेमध्ये शारीरिक आणि भावनिक पातळीवर अनेक बदल होत असतात. त्यामुळे ताकद परत मिळविण्यासाठी तिने पुरेशा प्रमाणात आहार घेऊन स्वत:ची काळजी घेणे अत्यावश्यक आहे; पण जीवनशैलीतील बदलांमुळे त्यांच्या पोषक आहारातही बदल होत आहेत. याचा बाळाच्या वाढीवर आणि पोषणावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहे. ७० टक्के नवमातांकडून पोषण आहाराबाबत पालनच होत नसल्याचे डॉक्टरांचा अंदाज आहे.

पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलमधील कार्यकारी आहारतज्ज्ञ डॉ. अल्का भारती म्हणाल्या, ‘बहुतेक नवमाता प्रसूतीच्या दोन महिन्यांनंतर पोषक आहार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. याची दोन कारणे आहेत. त्या नोकरदार महिला असतात किंवा त्यांचे छोटे कुटुंब असल्यामुळे त्यांना पोषण आहार घेणे कठीण होऊन बसते. स्तनपान करण्याच्या पूर्ण सहा महिन्यांच्या काळात उत्तम आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.’

‘अपुरा आणि पुरेसा पोषक आहार न घेतल्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतोच, त्याबरोबर दीर्घकालीन विचार करता त्याच्या आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच नवमातांनी पुरेसा सकस आहार घ्यावा आणि त्यात योग्य प्रमाणात कॅलरी, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि क्षार यांचा समावेश असावा,’ अशी पुष्टी डॉ. भारती यांनी जोडली.

नवमातांनी आहाराबाबत घ्यावयाची काळजी : दैनंदिन आहाराची दिनचर्या आखून घेऊन तिचे पालन करावे. दिवसातून पाच ते सहा वेळा आहार घ्यावा. त्यात प्रथिने, हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असावा. सुका मेवा, एनर्जी बार, सुक्या मेव्याचे लाडू, फळे इत्यादी जिन्नस जवळ बाळगावा. तेलकट आणि मसालेदार पदार्थ, अतिप्रमाणात चहा व कॉफी पिणे टाळावा.

त्याचप्रमाणे ज्या नवमातांना प्रसूतीनंतर लगेचच वजन कमी करायचे असेल स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असलेला आहार घ्यावा आणि ताज्या भाज्या, फळे आणि प्रथिने व कर्बोदके संतुलित प्रमाणात असलेल्या आहारवर भर द्यावा. व्यायाम आणि योगासनांमुळे कॅलरीज कमी करता येतात आणि स्नायू व हाता पायांना बळकटी प्राप्त होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link