Next
पुण्यात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता
प्रेस रिलीज
Wednesday, January 02, 2019 | 04:29 PM
15 0 0
Share this article:पुणे : दिव्य ज्योती परिवार आणि दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे आयोजित केलेल्या सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक व संचालक प.पू. सर्वश्री आशुतोष महाराज यांच्या शिष्या आणि भारतातील विख्यात भागवत भास्कर भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यानिमित्त यज्ञ, पूर्णाहुती, भागवत पूजन, आरती करण्यात आली.

२५ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू होता. हा कार्यक्रम सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाला. सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमात आध्यात्म, विज्ञान, भक्तिरस आणि सुमधूर संगीताने भाविकांना मंत्रमुग्ध केले. सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक रवींद्र धंगेकर, पिंपरी-चिंचवड येथील आमदार लक्ष्मण जगताप, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील हे उपस्थित होते.या सप्ताहामध्ये भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांनी भागवत माहात्म्य सांगून सद्य चालू परिस्थितीबाबत लोकांचे प्रबोधन करून समाज जागृतीचे दिले. कलश यात्रा, भागवत महात्म्य (परीक्षित को शाप), कपील देवहूती संवाद, वृत्रासूर कथा, प्रल्हाद प्रसंग आणि होळी उत्सव, बलिवामन कथा, कृष्ण जन्मोत्सव, कृष्ण बाललीला, गोवर्धन उत्सव, मथुरा गमन व कंस वध, रुक्मिणी विवाह, भागवत पूजन, पुर्णाहुती यज्ञ व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम या सप्ताहात झाले.

चिदानंद स्वामी म्हणाले, ‘प.पू. सर्वश्री आशुतोष महाराजांच्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य लीला मानव समाजाला जीवन जगण्याची कला शिकवितात. आज मनुष्य जीवन अनेक समस्यांनी व्यापलेले आहे. भ्रष्टाचार, नशाखोरी, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसाचार, चरित्रहिनता, गो-हत्या, पर्यावरणाचा असमतोल यांसारख्या अनेक समस्यांचे समाधान प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांमध्ये आहे.’‘आज २१ व्या शतकातही भगवान श्रीकृष्णांच्या दिव्यलीला मानव समाजाला अध्यात्म ज्ञानाद्वारे (ब्रह्मज्ञानाद्वारे) शाश्वत भक्ती मार्गावर अग्रेसर करण्यासाठी ठरत आहे. आध्यात्मिक रहस्यांनी ओतप्रोत असलेल्या लीलांना श्रीमद्भागवत महापुराणाच्या आधारे समाजासमक्ष प्रकट करणे हा प्रमुख उद्देश आहे. या प्रमुख उद्देशासाठी हा सप्ताह आयोजित केला होता,’ असे चिदानंद स्वामी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search