Next
दौंड तालुक्यात तीन हजार सायकलींचे वाटप
प्रेस रिलीज
Tuesday, July 17 | 03:28 PM
15 0 0
Share this story

पुणे : पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, टाटा ट्रस्ट व मेंटॉर फाउंडेशन यांच्या वतीने दौंड तालुक्यातील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड येथे विद्यार्थिनींना ‘टू व्हील्स ऑफ होप’ या उपक्रमाअंतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सायकलींचे तीन हजार सायकलींचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त रामचंद्र व्यंकटरामन, टाटा ट्रस्टचे मुख्य वित्त अधिकारी आशिष ​​देशपांडे, मुंबईमधील प्रख्यात पॅथेलॉजिस्ट डॉ. मोहमद अली पाटणकर, हिरो सायकल्सचे हेड ऑफ ऑपरेशन नीरज चंद्रा, नर्मदा बालघर चॅरिटेबल ट्रस्टचे भारत मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘अशा प्रकारचे उपक्रम समाजामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घेण्यात आले पाहिजे. पवार चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच अशा उपक्रमांना सहकार्य करेल. विद्यार्थिनींनी या सायकलींचा वापर शैक्षणिक हेतूसाठी करून उज्वल भविष्य घडवावे. यामुळेच अशा प्रकारच्या उपक्रमांमागील उद्देश साध्य होईल. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम असून, मी या उपक्रमाचा एक भाग झाल्याने मला खूप आनंद होत आहे.’

‘टू व्हील्स ऑफ होप या उपक्रमामध्ये ग्रामीण विभागाचे शैक्षणिक व सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत असून, दौंड व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन व सबलीकरणासाठी १५ हजार सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे उपक्रम समाजाच्या विकासासाठी आम्ही असेच पुढे चालू ठेवू. या योजनेअंतर्गत माजी कृषी मंत्री शरद पवार यांचा पुणे जिल्ह्यात १५ हजार सायकली वाटप करण्याचा मानस आहे. शाळा घरापासून दूर आहे म्हणून एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, ही यामागची भावना आहे. त्यामुळेच ‘टू व्हील्स ऑफ होप’ या मोहिमेअंतर्गत आम्ही या सायकल वाटत आहे,’ असे सुळे यांनी सांगितले.

(या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link