Next
हवा आने दे... : गाण्याच्या व्हिडिओतून पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती
BOI
Monday, June 03, 2019 | 06:32 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : पाच जूनला असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एका गाण्याचा व्हिडिओ तयार केला आहे. ‘हवा आने दे..’ असे बोल असलेल्या या गाण्यात अभिनेता अक्षय कुमारसह कपिल शर्मा, विकी कौशल, राजकुमार राव यांसारखे कलाकारही सहभागी झाले आहेत. ‘वायू प्रदूषण’ ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना असल्याने त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी हे विशेष गाणे तयार करण्यात आले असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पर्यावरण मंत्रालय आणि भामला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. गीतकार स्वानंद किरकिरे यांनी हे गाणे लिहिले असून, शंतनू मुखर्जी यांनी त्याला संगीत दिले आहे. गायक शान, शंकर महादेवन, सुनिधी चौहान, कपिल शर्मा यांनी हे गाणे गायले आहे. 

हे गाणे तीन मिनिटे ३२ सेकंदांचे आहे. गायक शान यांनी नुकतेच या गाण्याबाबत ट्विट केले आहे. अक्षय कुमार तोंडावर मास्क लावून जॉगिंग करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. याशिवाय ठिकठिकाणी बॅनर घेऊन उभे असलेले नागरिक वायूप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांबाबत जागृती करत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)



हेही जरूर वाचा...

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search