Next
कपूर कुटुंबीयांनी घेतले बाळ येशूचे दर्शन
BOI
Tuesday, April 23, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:


नाशिक : गेली कित्येक दशके बॉलीवूडवर अधिराज्य करणाऱ्या कपूर कुटुंबातील करिश्मा-करिना या भगिनी आणि त्यांची आई अभिनेत्री बबीता यांचा पुणे-नाशिक रस्त्यावरील सेंट झेवियर्स चर्चमधील बाळ येशूचे दर्शन घेतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी येशूचे दर्शन घेऊन कुटुंबाच्या आणि विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना केल्याचे सांगितले आहे. 

नाशिक-पुणे रस्त्यावरील या सेंट झेवियर्स चर्चमध्ये हे कुटुंब पोहोचताच त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. अभिनेत्री बबीता, करिश्मा कपूर, करिना कपूर-खान, करिश्माची मुले आणि इतर काही नातेवाईक या फोटोत दिसत आहेत. बाळ येशूचा हा भारतातील पहिला चर्च समजला जातो. 

२० एप्रिलला सकाळी मुंबईहून निघालेले हे कुटुंब आधी ओझर याठिकाणी गेले. त्यानंतर या चर्चमध्ये बाळ येशूचे दर्शन घेण्यासाठी आले असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही हे कुटुंब याठिकाणी येऊन गेल्याचे चर्चच्या फादर ट्रेव्हर मिरांडा यांनी सांगितले. तसेच बबिता यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सगळे याठिकाणी दर्शनासाठी आल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी फादर मिरांडा यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. दानधर्म करा, अन्नदान करा, भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्या व्यक्तीला पाणी द्या आणि निराधारांना आधार द्या, अशी येशूची शिकवण असून सर्व जगाचे कल्याण झाले पाहिजे हा सर्वधर्मीय विचार या वेळी फादरनी सांगितला. 

कपूर कुटुंबीय दर्शनासाठी येणार असल्याचे माहीत असूनही चर्च प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव याबाबत गुप्तता पाळली होती. या चर्चला धार्मिक महत्त्व असून जगभरातून लोक या चर्चमध्ये येतात आणि बाळ येशू चरणी प्रार्थना करतात. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search