Next
कला जत्रेत यंदाही ‘लेन्स आर्ट’तर्फे छायाचित्र प्रदर्शन
‘ब्लॅक अँड व्हाइट’ आणि ‘आर्किटेक्चरल लँडस्केप’ या विषयांवरील छायाचित्रे
BOI
Monday, January 21, 2019 | 11:59 AM
15 0 0
Share this story

फोटो : अभिजित बोडस

रत्नागिरी :
येत्या २५ ते २७ जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीत आर्ट सर्कल संस्थेने आयोजित केलेल्या थिबा राजवाडा संगीत महोत्सवात कला जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कला जत्रेत दर वर्षीप्रमाणे यंदाही या कला जत्रेत ‘लेन्स आर्ट’तर्फे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

यंदाच्या प्रदर्शनात ‘ब्लॅक अँड व्हाइट’ आणि ‘आर्किटेक्चरल लँडस्केप’ या दोन विषयांवर आधारित १००हून अधिक छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. ‘रत्नागिरीतील विविध हौशी छायाचित्रकारांनी निरनिराळ्या दृष्टिकोनातून आपापल्या पद्धतीने विषय मांडण्याचा प्रयत्न केला असून, शहरातील सुमारे २५ ते ३० छायाचित्रकारांनी सहभाग घेतला आहे,’ असे ‘लेन्स आर्ट’चे सिद्धेश वैद्य यांनी सांगितले. 

फोटो : उपेंद्र बापट

गेली तीन वर्षे रत्नागिरीमध्ये कार्यरत असलेल्या हौशी छायाचित्रकारांच्या या ग्रुपने दर वर्षी विविध विषय घेऊन, अभ्यासपूर्ण छायाचित्रांचे प्रदर्शन कला जत्रेमध्ये मांडले होते. सुरुवातीला रत्नागिरीतील सर्व व्यवसायांवर आधारित प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यानंतर ‘लेन्स आर्ट’च्या पक्षिप्रेमी शाखेने रत्नागिरीमध्ये आढळणाऱ्या सुमारे २०० प्रकारच्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते. 

या वर्षी हीच टीम ‘ब्लॅक अँड व्हाइट’ आणि ‘आर्किटेक्चरल लँडस्केप’ या दोन विषयांवरील छायाचित्रे प्रदर्शनात मांडमार आहे. रत्नागिरीकरांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन ‘लेन्स आर्ट’तर्फे करण्यात आले आहे. हौशी छायाचित्रकारांना प्रोत्साहन म्हणून, या वर्षी प्रदर्शित केलेली छायाचित्रे विक्रीसाठीही उपलब्ध केली जाणार आहेत, असेही ‘लेन्स आर्ट’तर्फे कळविण्यात आले आहे. 

(प्रदर्शनातील निवडक छायाचित्रे पाहा सोबतच्या ‘स्लाइड-शो’मध्ये)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link