Next
तहानलेल्या निरगुडीला मिळाले पाणी
खासदार शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी
BOI
Tuesday, November 20 | 03:11 PM
15 0 0
Share this story

पुणे : नदी अगदी जवळ असूनही गेली अनेक वर्षे तहानलेल्या हवेली तालुक्यातील निरगुडी गावाला आता पाणी मिळाले आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या प्रयत्नांनी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, नुकताच शिरोळे यांच्या उपस्थितीत गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा पार पडला. 

या वेळी आमदार जगदीश मुळीक, महेश लांडगे, अनिल मोहिते, सरपंच अश्विनी सस्ते, नितीन काळजे, बापूसाहेब पठारे, योगेश सासवडे, हेमल काळोखे, संतोष पाटील, पूजा कदम, निलेश कदम, अनिल बगारे, शीतल कदम, सत्यवान कुंभार, संतोष कदम, कौशल रोकडे, श्वेता मगर, अनिल कदम, निलेश कदम आदी उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांनी आपले अनुभव मांडले. 

गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा त्यासाठी योग्य ती उपाययोजना राबवली जावी, यासाठी ग्रामस्थ सरकार दरबारी  प्रयत्न करत होते;मात्र त्यांना यश आले नाही. अलीकडेच गावकऱ्यांनी खासदार अनिल शिरोळे यांच्या समोर हा प्रश्न मांडला. शिरोळे यांनी सातत्याने पाठपुरावा करत गावाचा हा प्रश्न अखेर सोडवला.  


या वेळी बोलताना अनिल शिरोळे म्हणाले, ‘हवेली तालुक्यातील निरगुडी गावाच्या लोकांनी पाणीप्रश्नी लक्ष घालावे यासाठी माझ्याकडे विनंती केली. जवळून नदी जात असली, तरी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर होता हे लक्षात आल्यावर मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांशी संपर्क साधून, या प्रश्नाची चर्चा केली. पालिकेने गावाला रोज पिण्याच्या पाण्याचे चार टँकर पुरविण्याची सोय केली. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने गावकऱ्यांच्या मदतीने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली. आता गावाचा किमान पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे, याचा आनंद आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link