Next
‘मनुष्यबळ व्यवस्थापन प्रमुखांची भूमिका आव्हानात्मक’
प्रेस रिलीज
Thursday, November 30 | 06:00 PM
15 0 0
Share this story

मोहन डोळ लिखित 'रिलेशन ऑफ नो रिटर्न' या पुस्तकाचे प्रकाशन प्राज इंडस्ट्रिजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी  यांच्या हस्ते झाले. या वेळी  रश्मी हेबळकर, विश्वेश कुलकर्णी, अनुराधा डोळ, मोहन डोळ,  अनंत सरदेशमुख, आर. वाय. जोशी,  एस.जी.चव्हाण आदी उपस्थित होते.
पुणे : ‘वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे  देशातील सर्व उद्योगजगताच्या कार्यपद्धतीमध्येही  मोठ्या प्रमाणात बदल  होत असून भविष्यात बदलाचा हा वेग आणखी वाढणार असल्याने अशा परिस्थितीत मनुष्यबळ व्यवस्थापकांची भूमिका आव्हानात्मक असणार आहे’, असे मत प्राज इंडस्ट्रिजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले. 

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या सभागृहात झालेल्या नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट, आयएसटीडी एच.आर.फोरमच्या कार्यक्रमात बोलत  होते. या वेळी  त्यांच्या हस्ते नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट  (एनआयपीएम) च्या वतीने  २८ व  २९ सप्टेंबर २०१८  रोजी होणाऱ्या 'नॅटकॉन २०१८' या राष्ट्रीय परिषदेच्या 'लोगो' चे अनावरण करण्यात आले . 'नॅटकॉन २०१८'  या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्याचा मान  यंदा एनआयपीएमच्या पुणे विभागाला मिळाला असून 'कामकाजातील  भविष्यातील  आव्हानांचे व्यवस्थापन' ही  या परिषदेची मुख्य संकल्पना  आहे. 

या वेळी ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ञ् मोहन डोळ यांनी लिहिलेल्या 'रिलेशन ऑफ नो रिटर्न' या पुस्तकाचे प्रकाशन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात 'नॅटकॉन २०१८'  या राष्ट्रीय परिषदेविषयीची सविस्तर माहिती  या परिषदेचे मुख्य समन्वयक व भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही. भावे यांनी सादर केली.या वेळी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स  इंडस्ट्रीज अँड  अॅग्रीकल्चर (एमसीसीसीआयए) चे महासंचालक अनंत सरदेशमुख म्हणाले,  ‘यांत्रिकीकरणामुळे करावी लागणारी कामगार कपात आणि नव्या तंत्रज्ञानाला हाताळू शकणारे मनुष्यबळ उपलब्ध करणे  असे दुहेरी आव्हान सध्या मनुष्यबळ व्यवस्थापकांसमोर आहे. 

ज्येष्ठ विधिज्ञ आर. वाय. जोशी यांनी 'मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीवर परिणाम करणारे न्यायालयीन खटले' या विषयावर बोलताना विविध खटल्यांची उदाहरणे देत  मार्गदर्शन   केले.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश  कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन इंडियन सोसायटी ऑफ  ट्रेनिंग अँड डेव्हलपमेन्टच्या अध्यक्ष रश्मी हेबळकर  यांनी केले. सूत्रसंचालन  अनुजा देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाला एनआयपीएमचे पश्चिम  विभागीय प्रमुख एस.जी.चव्हाण यांच्यासह पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे  सुमारे दोनशेहून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link