Next
दिग्गज मराठी कलाकारांच्या दुर्मिळ चित्रांचे नाशिकमध्ये प्रदर्शन
प्रेस रिलीज
Wednesday, May 02 | 02:46 PM
15 0 0
Share this story

पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. च्या पुण्यातील दालनात झालेल्या   ‘अबीर गुलाल-रंग महाराष्ट्राचे’ या दिग्गज मराठी कलाकारांच्या दुर्मिळ चित्रांच्या प्रदर्शनाला अतुल किर्लोस्कर आदी मान्यवरांनी भेट दिली.

नाशिक : महाराष्ट्राला मोठी कला परंपरा लाभली असून, अनेक मोठे कलावंत जगाला महाराष्ट्राने दिले आहेत. अशाच दिग्गज कलाकारांच्या कलांचे ‘अबीर गुलाल-रंग महाराष्ट्राचे’, हे चित्र प्रदर्शन पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत नाशिकमध्ये होत आहे. नाशिक रोडवरील शिखरेवाडीतील पासपोर्ट कार्यालयाजवळील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडच्या दालनातील कला दालनात सहा मे ते तीन जूनदरम्यान प्रदर्शन होत असून, उद्घाटन महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता होईल. तसेच, प्रदर्शन सोमवार सोडून अन्य सर्व दिवस सकाळी अकरा  ते सायंकाळी आठ या  वेळेत सर्वांसाठी मोफत खुले राहील.

‘जागतिक पातळीवर नावाजलेल्या व जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि कोल्हापूर चित्रशैली विकसित केलेल्या मराठी कलाकारांची दुर्मिळ व मूळ चित्रे प्रदर्शनात असणार आहेत. यामध्ये म. वि. धुरंधर, एन. एस. बेंद्रे, एच. ए. गाडे,  ए.ए. आलमेलकर,  प्रभाकर बरवे,  ज. द. गोंधळेकर, अनंत माळी, सदानंद बाकरे, गोविंद सोलेगावकर, प्रभाकर कोलते आदी दिग्गज कलाकारांची दुर्मिळ चित्रे पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहेत’, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे अध्यक्ष अजित गाडगीळ यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link