Next
सोलापुरातील रवींद्रच्या अवयवदानाने चौघांना जीवदान; दोघांना दृष्टी
BOI
Tuesday, July 24, 2018 | 11:59 AM
15 0 0
Share this story

अवयव पुण्याला नेत असताना...सोलापूर : अवयवदानाची चळवळ केवळ पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतच नव्हे, तर छोट्या शहरांतही हळूहळू रुजू लागल्याचे चित्र आषाढी एकादशीदिवशी सोलापुरात पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील हिवरे येथील रवींद्र श्रीरंग शिंगाडे (३१) यांचा अपघात झाल्यामुळे ते ब्रेन डेड झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करण्याचा धीरोदात्त निर्णय घेतला. त्यामुळे चौघांना जीवदान आणि दोघांना नवी दृष्टी मिळणार आहे. 

सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये शिंगाडे यांचे हृदय, दोन्ही मूत्रपिंडे, दोन्ही डोळे, स्वादुपिंड आणि यकृत हे अवयव काढून पुण्यासह सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ही तयार करण्यात आला होता. दुपारी दोनच्या सुमारास यशोधरा हॉस्पिटलमधून निघालेली रुग्णवाहिका काही मिनिटांत विमानतळावर पोहोचली. विशेष विमानाने अवयव पुण्यात नेण्यात आले. हदय रुबी हॉस्पिटलमध्ये एक मूत्रपिंड आणि स्वादुपिंड हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ,तर यकृत बिर्ला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रवींद्र यांचे दोन्ही डोळे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात, तर एक मूत्रपिंड यशोधरा हॉस्पिटलमध्येच पाठवण्यात आले. 

रवींद्र शिंगाडेगेल्या काही वर्षांत अवयवदानाबद्दलची जागृती वाढत आहे; मात्र त्याचे प्रमाण मुंबई-पुण्यासारख्या शहरात अधिक आहे. छोट्या शहरांत आणि ग्रामीण भागातही या चळवळीचे महत्त्व पटायला हवे आणि त्या दृष्टीने सुविधाही उपलब्ध व्हायला हव्यात. रवींद्र यांच्या कुटुंबीयांनी दाखविलेल्या धीरोदात्तपणामुळे या चळवळीचा ग्रामीण भागातही प्रसार व्हायला मदत होणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Datta Bhosale ropale About 215 Days ago
barobar
0
0

Select Language
Share Link