Next
अनोखी प्रेमकहानी टिपणारा ‘फोटोग्राफ’
नवाजुद्दिन सिद्दिकीने शेअर केला ट्रेलर
BOI
Wednesday, February 20, 2019 | 05:02 PM
15 0 0
Share this story


मुंबई : छोट्या छोट्या भूमिकांमधून चर्चेत राहिलेला अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी सध्या बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता समजला जातो. तो करत असलेल्या कामाबरोबर सध्या इतर अनेक चित्रपटांचे काम त्याच्या हातात आहे. यापैकीच त्याचा एक आगामी चित्रपट ‘फोटोग्राफ’ येत आहे. यात त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

प्रदर्शित ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे नवाजुद्दिन यात एका रफी नावाच्या फोटोग्राफरच्या भूमिकेत आहे. त्याचे लवकर लग्न व्हावे आणि नातसुनेला पाहावे अशी त्याच्या आजीची इच्छा आहे. इकडे नवाज मात्र नूरी (सान्या मल्होत्रा)च्या प्रेमात पडतो. त्यानंतर नूरी आणि आजीची भेट त्यांच्यातले नाते असा प्रवास घडतो. दोन अनोळखी व्यक्तींची हळूवार फूलत जाणारी प्रेमकहानी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. ट्रेलर हा चित्रपटाबाबतची उत्कंठा वाढवणारा आहे. 

दिग्दर्शक रितेश बत्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. काही चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला असून त्याचे कौतुकही झाले आहे. दरम्यान नवाजुद्दिन सिद्दिकीने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला असून त्याला, ‘माझ्या गोड आजीच्या भेटीसाठी तिच्या नातसुनेला घेऊन येत आहे’, असे कॅप्शन दिले आहे...

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link