Next
पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात ‘एचडीएफसी’चे जलमित्र
प्रेस रिलीज
Tuesday, April 30, 2019 | 05:19 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : महाराष्ट्र या वर्षी तीव्र दुष्काळाला सामोरे जात असताना, महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त गावांमध्ये होत असलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटरकप २०१९’मध्ये सहभागी होऊन एक मे २०१९ रोजी श्रमदान करावे या आवाहनाला राज्यातील नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये ‘एचडीएफसी’ समूहातील ५०० कर्मचारी सहभागी होणार आहेत.

मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि नाशिक येथील ‘एचडीएफसी’ लिमिटेड आणि समूहातील इतर कंपन्यांमधून हे कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी ‘एचडीएफसी’च्या शाखांतील ३४० कर्मचार्‍यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला होता. ‘एचडीएफसी’ ही भारतातील आघाडीची गृहवित्त कंपनी असून, दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी काम करणार्‍या पाणी फाउंडेशनच्या प्रमुख समर्थकांपैकी एक आहे.

या प्रसंगी बोलताना ‘एचडीएफसी लिमिटेड’चे अध्यक्ष दीपक पारेख म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत पाणी फाउंडेशनची व्याप्ती तीनपासून ७६ तालुक्यांपर्यंत विस्तारली असून, याचे कार्य चार हजार गावांपर्यंत पोहचले आहे. पाणी संवर्धन व्यवस्थापनामध्ये लोकांना प्रशिक्षित करून त्यांचे प्रश्‍न स्वत: सोडविण्यासाठी सक्षम बनविणे हे पाणी फाउंडेशनच्या कार्याचे मुख्य ध्येय आहे. केवळ संस्थात्मक पातळीवर नव्हे, तर वैयक्तिक पातळीवरदेखील दर वर्षी आमचे कर्मचारी अधिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन या लक्षणीय लोक चळवळीमध्ये आपले योगदान देत आहेत. हे बघून मला अत्यंत आनंद होत आहे.’

अभिनेते व पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान म्हणाले, ‘या वर्षी पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानामध्ये ‘एचडीएफसी’ समूहाचे ५००हून अधिक कर्मचारी सहभागी होत आहेत, हे ऐकून मी भारावून गेलो आहे. गेल्या तीन वर्षांपासून ‘एचडीएफसी’शी असलेली भागीदारी मी महत्त्वपूर्ण मानतो. महाराष्ट्र दुष्काळमुक्त यासाठी ‘एचडीएफसी’ची असलेली कटिबद्धता व कर्मचार्‍यांचे स्वऐच्छिक प्रयत्न आणि दिलेला वेळ हा प्रशंसनीय आहे.’

‘एचडीएफसी’चे कर्मचारी श्रमदानासाठी गराडे (पुणे), धोंडबार (नाशिक, खरसोळी (नागपूर) व खांडी पिंपळगाव (औरंगाबाद) येथे सहभागी होतील. ‘वॉटरकप २०१८’मुळे ७५ तालुक्यांमध्ये २२ कोटी लिटरहून अधिक पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्राला पाणी संवर्धनाबाबत सुरक्षित बनविण्याच्या दिशेने यंदा गेल्या तीन वर्षाचे कार्य पुढे नेण्याची पाणी फाउंडेशनला आशा आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search