Next
आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी ‘रेल्वे’ची कारवाई
प्रेस रिलीज
Friday, May 04, 2018 | 11:27 AM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : रेल्वेगाडीत चहा, कॉफी विकणारा एक विक्रेता प्रसाधनगृहातून बाहेर येत असल्याचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसारित होतो आहे. या व्हिडिओसोबत आलेल्या संदेशात हा विक्रेता चहा, कॉफीच्या कॅन्समध्ये प्रसाधनगृहातील पाणी वापरत असल्याचेही म्हटले आहे. या व्हिडिओची गंभीर दखल घेत रेल्वे विभागाने योग्य ती कारवाई केली आहे.

या प्रकरणी तपास केल्यानंतर डिसेंबर २०१७मध्ये चेन्नई-हैदराबाद-चारमिनार एक्सप्रेस क्रमांक १२७५९ मध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले. याप्रकरणी सखोल तपास करण्यात आला असून, या विक्रेत्याला कामावर ठेवलेले कंत्राटदार पी. शिवप्रसाद यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे; तसेच ‘आयआरसीटीसी’ने याप्रकरणी शिवप्रसाद यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली असून, १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसणारे इतर दोन इसम अनधिकृत फेरीवाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पश्चिम मध्य रेल्वेच्या व्यावसायिक विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तपास मोहीम हाती घेतली असून, या दोघांसह इतर अनेक अनधिकृत फेरीवाल्यांना विक्रीस आणि प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कठोर निरीक्षण सुरू आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link