Next
‘केटीआय’तर्फे ‘फॅशनिस्टा’ फॅशन शो उत्साहात
प्रेस रिलीज
Tuesday, January 08, 2019 | 04:32 PM
15 0 0
Share this article:पुणे : व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण देणार्‍या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटतर्फे (केटीआय) ‘फॅशनिस्टा २०१८-१९’ हा फॅशन शो टिळक स्मारक मंदिर येथे नुकताच उत्साहात झाला. या कार्यक्रमासाठी ‘ब्राइडल अँड नेचर’ ही संकल्पना होती.

या प्रसंगी ‘केटीआय’चे क्षेत्रीय प्रमुख उमाकांत शेटे, प्राजक्ता शहा आदी, विशेष अतिथी म्हणून पुणे महानगरपालिकेचे स्थानिक संस्था कर आणि समाज कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन उदास, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या प्रियदर्शिनी निकाळजे उपस्थित होत्या. या शोसाठी ‘गॅल्युस इव्हेंट्स अ‍ॅंड एंटरटेन्मेंट’चे संस्थापक कमलेश बाफना, रूपिता इन्स्टिट्यूटच्या संचालिका निलांबरी थोरात आणि ‘पीआरएसके’च्या संचालिका व ‘गॅल्युस इव्हेंट्स’च्या सहसंस्थापिका प्रिया कोठारी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. क्षेत्रीय फेरीसाठी ‘केटीआय’च्या विविध शाखांतील ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
 
या वेळी बेस्ट ड्रेससाठी चिंचवड शाखेच्या प्राजक्ता वाघोले व अंजू यादव यांना प्रथम पारितोषिक मिळाले. डेक्कन शाखेच्या मिनाज शेख हिला दुसरे, तर हडपसर शाखेच्या मानसी हरपळे हिला तिसरे पारितोषिक मिळाले. बेस्ट कॉस्ट्युमसाठी सायली जगताप (हडपसर शाखा), बेस्ट वॉकसाठी प्रीती वाघ (नारायणगाव शाखा) यांना पारितोषिक मिळाले. या वेळी १० बेस्ट कॉस्ट्युमची निवड करण्यात आली असून ते मुंबईत होणार्‍या पुढील फेरीत सहभागी होणार आहेत.
 
‘केटीआय’च्या फॅशन डिझाइनिंगच्या विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला व क्रियाशीलतेला उत्तेजन देऊन व्यापक प्रमाणात स्पर्धात्मक प्रदर्शन करण्यासाठी ‘केटीआय फॅशनिस्टा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पुणे विभागातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थिनींसाठी ‘केटीआय’ने ही एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या शोदरम्यान आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थिनींनी त्यांच्यातील नवनिर्मितिक्षमता व सृजनशीलता यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search