Next
कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
प्रेस रिलीज
Friday, May 03, 2019 | 11:46 AM
15 0 0
Share this article:


नवी मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या ५९व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. या प्रसंगी ठाकूर यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

या वेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, उपआयुक्त (सामान्य प्रशासन) अनंत दहिफळे, उपायुक्त (आस्थापना) गणेश चौधरी, उपायुक्त (रोहयो) वैशाली राज चव्हाण, उपायुक्त (नियोजन) बी. एन. सबनीस, तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.  


या वेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा पथक, सिडको अग्निशमन दल पथक, नवी मुंबई पोलीस बॅंड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, नवी मुंबई पोलीस श्वान पथक, बुलेट ब्रुफ वाहन, आरआयव्ही वाहन, वज्र वाहन, बीडीडीएस वाहन, वरुण वाहन, अग्निशमन दल वाहन, आदींनी संचलनाद्वारे ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. सूत्रसंचालन शुभांगी पाटील आणि निंबाजी गिते यांनी केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search