Next
‘क्रेडाइ’तर्फे ५० हजार बांधकाम कामगारांना प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Thursday, April 19 | 04:53 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘क्रेडाइ’ने ५५ शहरांतील पीएमकेव्हीवाय, आरपीएल, ब्रिज आरपीएल आणि विशेष प्रकल्पांच्या ४५० स्थळांवर एक लाखाहून अधिक बांधकाम मजुरांना प्रशिक्षण दिले आहे आणि केवळ पुणे विभागातील ५० हजार कामगारांना प्रशिक्षण देऊन एक मापदंड स्थापन केला आहे.

बांधकाम उद्योग हा भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात सर्वाधिक योगदान देणारा उद्योग आहे. तरीही वेगाने वाढणाऱ्या या उद्योगापुढे अकुशल मनुष्यबळ हे मोठे आव्हान आहे. भारतात औपचारिकदृष्ट्या प्रशिक्षित मनुष्यबळाचे प्रमाण चार टक्के आहे. चीन (४७ टक्के), ब्रिटन (६८ टक्के), जर्मनी (७४ टक्के), जपान (८० टक्के) आणि दक्षिण कोरिया (९६ टक्के) या देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

या पार्श्वभूमीवर, बांधकाम मजुरांमधील कौशल्य विकास हा गेल्या काही वर्षांपासून ‘क्रेडाइ’पुढील प्राधान्याचा विषय राहिला आहे. बांधकाम उद्योगातील ही कौशल्याची तूट भरून काढण्यासाठी वचनबद्ध असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (क्रेडाइ) बांधकाम मजुरांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. “कुशल” या प्रशिक्षण कार्यक्रमासह क्रेडाइने कौशल्याच्या क्षेत्रात २०११ मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून, क्रेडाइ २३ राज्यांतील १८९ शहरांमधील आपल्या सदस्य विकासकांच्या माध्यमातून बांधकाम मजुरांसाठी प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रावर प्रशिक्षण कार्यक्रम घेत आहे.

‘क्रेडाइ’ने काही ऑफ-साइट्स सेंटर्सवर उदाहरणार्थ, बांधकाम मजुरांची पारंपरिकरित्या भरती ज्या ठिकाणी होते तेथे, कौशल्य प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्या ठिकाणच्या बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण द्यायचे आणि अगदीच नवीन आणि अननुभवी कामगार कामावर घेण्याऐवजी या युवकांच्या भरतीसाठी कामगार कंत्राटदारांसोबत करार करायचे अशी ही कल्पना आहे. या कामगारांना प्रथम बांधकामाचे औपचारिक प्रशिक्षण दिले जाते आणि मग प्रत्यक्ष कामावर घेतले जाते. या मार्गाने मागील-पुढील दुवे जोडून भारत सरकारच्या कौशल्य उपक्रमाचा हेतू पूर्ण करत आहे.

अशा प्रकारेच उद्योग स्वत:च प्रशिक्षण सहयोगी म्हणून काम करण्यासाठी पुढे येतात आणि क्रेडाइने स्थान केलेल्या ऑफ-साइट केंद्रांमधून बेरोजगार युवकांना कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रत्यक्ष कामावर घेतात. दगडकाम, विटा लावणे, टाइल्स बसवणे, गज वाकवणे, शटरिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिकल कामे आणि प्लम्बिंग आदी कामांचे प्रशिक्षण तीन हजार ५०० कामगारांना देण्यात आले आहे.

एकदा प्रशिक्षण पूर्ण झाले की, आमच्या सदस्य विकासकांच्या देशभर चाललेल्या विविध बांधकामांच्या ठिकाणी अधिक वेतनावर कामगार कंत्राटदारांमार्फत नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत केली जाते. ऑफ-साइट कौशल्य प्रशिक्षण केंद्रे आणि नोकरभरती यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी ‘सीएसडीसीआय’सोबत काम करण्यासाठी एक मोबाइल अॅप विकसित करण्याची प्रक्रिया सध्या ‘क्रेडाइ’ पूर्ण करत आहे.

‘क्रेडाइ’चे राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा म्हणाले, ‘उद्योगाशी संबधित सर्वांच्या वाढीत योगदान देण्याची भूमिका क्रेडाइने कायम पार पाडली आहे. या उपक्रमामार्फत, क्रेडाइने पुणे व देशाच्या अन्य भागांतील हजारो बांधकाम मजुरांसाठी सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक स्वरूपातील प्रशिक्षण सत्रे घेऊन त्यांचे आयुष्य बदलून टाकण्यात यश मिळवले आहे. एक उद्योगांची संघटना म्हणून, उद्योगाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कुशल कामगारांचे महत्त्व आम्हाला उमगले आहे. त्यामुळेच आमचा हा उपक्रम जास्तीत जास्त बांधकाम मजुरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link