Next
भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्ता होणार सहा पदरी
पालकमंत्री एकनाथ शिंदे करणार रुंदीकरण कामाचे भूमिपूजन
BOI
Saturday, December 29, 2018 | 03:47 PM
15 0 0
Share this story

ठाणे : ‘भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आणि पायाभरणी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पलावा जंक्शन देसाई गाव येथे उड्डाणपुलाची पायाभरणी होईल. त्यानंतर चार वाजता पत्रीपूल येथे रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनाचा मुख्य समारंभ होईल,’ अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आणि सहा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

हा मार्ग सुमारे २१ किमी इतका असून, शिळफाटा ते रांजनोली जंक्शन असे काम होणार आहे. या वेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार, बंदरे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे तसेच खासदार, आमदार उपस्थिती राहणार आहेत.  

या रुंदीकरणामुळे शीळफाटा रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, या रस्त्यावरून नाशिकमार्गे आग्र्याकडे, तसेच गोवा-कर्नाटककडे होणारी अवजड रस्ते वाहतूक आणि त्यामुळे होणारे वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहेत. नाशिक, गुजरात, पुणे शहरांकडे जाण्यासाठी शीळफाटा, भिवंडी वळण रस्ता हा मधला मार्ग असल्याने अवजड साहित्याचे वाहतूकदार शीळफाटा रस्त्याला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत.

या मार्गाच्या रुंदीकरणासाठी २१२ कोटी खर्च आहे. १६ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आला असून, मे. राम क्रिपाल सिंग हे कंत्राटदार काम करणार आहेत. ३० महिन्यांत हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. या सहापदरी कामामध्ये पलावा जंक्शन येथे दोन पदरी उड्डाण पूल, दिवा–पनवेल रेल्वे मार्गावर कटई येथे रेल्वे उड्डाणपूल, पत्रीपूल येथे दोन पदरी रेल्वे पूल, १४ मोठे जंक्शन्स, ३१ बसस्थानके, दोन पथकस्थानके अशा कामांचा समावेश आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 18 Hours ago
His oratory was directed towards emotions .
0
0

Select Language
Share Link