Next
‘डॉ. बत्राज’तर्फे ‘जेनो होमिओपॅथी’ उपचारपद्धती
प्रेस रिलीज
Saturday, June 09, 2018 | 11:23 AM
15 0 0
Share this story

डॉ. बत्राज हेल्थकेअरचे ज्येष्ठ होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉ. पल्लव ठाणावाला (डावीकडे) आणि डॉ. बत्राज हेल्थकेअरचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अक्षय बत्रापुणे : होमिओपॅथी क्षेत्रात जगभरात गेली चार दशके आपले अव्वल आणि अनोखे स्थान निर्माण केलेल्या डॉ. बत्राजतर्फे डॉ. बत्राज ‘जेनो होमिओपॅथी’ ही एक क्रांतिकारी उपचारपद्धती सादर करण्यात आली. ही क्रांतिकारी आणि अद्वितीय अशी जनुक आधारित शास्त्रशुद्ध, अचूक, सुरक्षित आणि प्रत्येक व्यक्तीसाठी अनोख्या प्रकारे योजिलेली होमिओपॅथिक उपचारपद्धती भारतात प्रथमच उपलब्ध होत आहे.

डॉ. बत्राज जेनो होमिओपॅथी ही आधुनिक काळातील सानुकूल उपचारपद्धती आहे. ही जनुकीय आधारित वैयक्तिक होमिओपॅथिक केअर पद्धत आहे. या पद्धतीमध्ये व्‍यक्‍तीच्‍या जनुकीय रचनेनुसार उपचार केला जातो. यामध्‍ये वैज्ञानिक व लक्ष्‍य उपचारासाठी व्‍यक्तिमत्त्व व जनुकांचा समावेश असतो. ही एक अत्यंत व्यक्तिगत अशी उपचारपद्धती आहे कारण कोणत्याही दोन व्यक्तींची जनुके एकसारखी नसतात. प्रत्‍येक व्‍यक्‍तीची जनुके ही त्‍यांच्‍या बोटांचे ठसे किंवा डोळ्यातील बुबुळाप्रमाणेच वेगवेगळी असतात. म्‍हणूनच अस्तित्‍वात असलेल्‍या पारंपरिक उपचार पद्धतींपेक्षा डॉ. बत्राज जेनो होमिओपॅथीमध्‍ये एकच वैद्यकीय आजार असलेल्‍या दोन रुग्‍णांवर समान औषधोपचार केला जात नाही. त्‍यांच्‍या जनुकीय रचनेच्‍या आधारावरच औषधोपचार केला जातो आणि हा उपचार प्रत्‍येक व्‍यक्‍तीसाठी वेगळा असतो. ज्‍यामुळे प्रत्‍येक रुग्‍णावर औषधांचा अधिक प्रभावी परिणाम दिसून येतो.

संशोधनातून निदर्शनास आले आहे की, होमिओपॅथीक औषधांमध्‍ये कोणत्‍याही दुष्‍परिणामांशिवाय कोणताही आजार बरा करण्‍याची क्षमता आहे. डॉ. बत्राज जेनो होमिओपॅथी आजाराचे सखोल कारण जाणून घेते; रुग्‍णाच्‍या जनुकांची माहिती घेत योग्‍य होमिओपॅथिक औषधोपचार करते. वैद्यकीय आजाराच्‍या मूळ कारणावर उपचार केला जात असल्‍यामुळे रुग्‍णाला असह्य लक्षणांपासून आराम मिळण्‍यासोबतच त्‍यांना दीर्घकाळापर्यंत आजारातून बरे केले जाते.

डॉ. बत्राज वैद्यकीय तज्‍ज्ञांच्‍या टीमसोबतच जेनोमिक्‍समधील स्‍पेशालिस्‍ट्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील स्‍पेशालिस्‍ट कन्‍सल्‍टटंट्सनी जेनो होमिओपॅथी चाचण्‍या डिझाइन केल्‍या आहेत. डॉ. बत्राज येथे एलर्जी, बालकांचे आरोग्‍य, केस गळणे, प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य (पुरुष, महिला, बालक), त्‍वचेचे आजार, ताणतणाव, वजनावरील नियंत्रण, महिलांचे आरोग्‍य आणि लैंगिक आरोग्‍य अशा विविध आजारांसाठी १५ लाख रुग्‍णांवर केलेल्‍या उपचारांच्‍या व्‍यापक अनुभवाच्‍या आधारावर या चाचण्‍या डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. म्‍हणूनच रुग्‍ण या सोप्‍या, जनुकीय चाचणीसह आजारांवर नियंत्रण ठेऊ शकतात. ही चाचणी वेदनाविरहित असून, भारतभरातील सर्व डॉ. बत्राज क्लिनिक्‍समध्‍ये वाजवी दरात उपलब्‍ध आहे.

जेनो होमिओपॅथी चाचणी रुग्‍णांना भविष्‍यात एखादा आजार होण्‍याचा धोका आहे की नाही याबाबत देखील माहिती सांगेल. म्हणजेच आजाराची लक्षणे दिसून येण्‍यापूर्वीच किंवा रक्‍त चाचण्‍यांमधून आजारांचे निदान होण्‍यापूर्वीच वैद्यकीय आजारावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. ही चाचणी रुग्‍णांना जीवनशैली आजारांवर नियंत्रण ठेवण्‍यासोबतच त्‍यांवर उपचार करण्‍याची संधी देते.

डॉ. बत्राज ‘जेनो होमिओपॅथी बँक’ नावाची रुग्‍णाच्‍या जेनोमिक डेटाची बँक देखील स्‍थापित करणार आहे. रुग्‍णांसाठी कोणती उपचारपद्धती अधिक प्रभावी असेल किंवा भविष्‍यात ते कोणत्‍या उपचारपद्धतीला प्रतिसाद देऊ शकतील याचा अंदाज करण्‍यासाठी या जेनोमिक डेटाचा उपयोग होईल. हा डेटा इतर रुग्‍णांसाठी उत्‍तम उपचारपद्धती ठरवण्‍यासाठीही मदत करेल. विशिष्‍ट जनुकीय रचनेसाठी कोणती होमिओपॅथिक औषधे योग्‍य आहेत किंवा विशिष्‍ट आजाराने पिडीत रुग्‍णाला इतर कोणता आजार आहे का (उदाहरणार्थ सोरायसिस हा त्‍वेचचा आजार असलेला रुग्‍ण मधुमेहाने देखील पिडीत असू शकतो) याचे विश्‍लेषण करण्‍यामध्‍येही हा डेटा मदत करेल. यासह प्रत्‍येक रुग्‍णाला सर्वोत्‍तम व जलद उपचार मिळेल.

याबद्दल बोलताना डॉ. बत्राज हेल्‍थकेअरचे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. अक्षय बत्रा म्‍हणाले, ‘जेनो होमिओपॅथीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही उपचारपद्धतीच्‍या भवितव्‍यामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहोत. डॉ. बत्राज नेहमीच तंत्रज्ञान, संशोधन व भावी थरेपींमध्‍ये अग्रस्‍थानी राहिले आहेत. जेनो होमिओपॅथी सादर करत आम्‍ही आमच्‍या रुग्‍णांना तंत्रज्ञानदृष्‍ट्या उच्‍च दर्जाची उपचारपद्धत सादर करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. ही पद्धत सानुकूल व केंद्रित असण्‍यासोबतच परवडणारी आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link