Next
‘स्क्वॉट्स’चा महाराष्ट्रात विस्तार
प्रेस रिलीज
Monday, July 16 | 03:29 PM
15 0 0
Share this story

मुंबई : गेल्या दोन वर्षात ऑनलाइन फिटनेस कन्सल्टेशन क्षेत्रात यशस्वीरीत्या आपला ठसा उमटविणाऱ्या पुणे येथील फिटनेसबाबत ऑनलाइन सल्ला सेवा पुरविणाऱ्या ‘स्क्वॉट्स’ने आता पुणे आणि मुंबई येथे आपली केंद्रे सुरू केली आहेत. येथे इच्छुक लोकांना उपयुक्त अशा आरोग्यविषयक टिप्स, डाएट प्लॅन, वर्क-आऊट प्रोग्राम आणि प्रत्यक्ष सल्ला देण्यात येईल.

‘पोषण आणि प्रशिक्षणाचा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन अनुसरून स्क्वॉट्सने आपल्या ऑनलाइन मंचाद्वारे (www.squats.in) ४० हजार पेक्षा जास्त लोकांना शारीरिक परिवर्तन घडवून आणण्यास मदत केली आहे. त्यांची ऑफलाइन केंद्रे हेच मिशन आणखी पुढे घेऊन जातील. त्यामध्ये संपूर्ण शारीरिक बदलासाठी व्यक्ती-विशिष्ट पोषण आणि प्रशिक्षण प्लॅन देण्यात येतील; तसेच त्यात साप्ताहिक फॉलो-अप आणि सल्लादेखील असेल. आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देण्यात येईल. नवोदित अॅथलिटसाठी स्पोर्टस न्यूट्रिशनबाबत मार्गदर्शन पुरविण्यात येईल’, अशी माहिती  स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगच्या संचालक ज्योती सहरावत डबास यांनी दिली. 

त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही आमच्या ऑफलाइन सुरुवातीबद्दल उत्साही आहोत कारण, आपल्या फिटनेसच्या वाटचालीत देश विदेशातील आमचे ग्राहक आमच्यावर विसंबून आहेत आणि संतुष्ट आहेत. या आर्थिक वर्षात देशातील टिअर एक  आणि टिअर दोन शहरांमध्ये आम्ही आमची दहापेक्षा जास्त केंद्रे स्थापन करणार आहोत. २०२० पर्यंत टिअर तीन  शहरांसह १२० पेक्षा अधिक  केंद्रे स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link