Next
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Friday, June 08, 2018 | 01:42 PM
15 0 0
Share this story

डीकेटीई व श्रद्धा इन्स्टिट्यूटद्वारे आयोजित प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधीच्या मार्गदर्शन करीत असताना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व श्रद्धा इन्स्टिट्यूटचे प्रा. ए. आर. तांबे.इचलकरंजी : ‘करिअर निवडीतील संभाव्य चुका टाळण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त विविध इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या विकल्पांची यादी पूर्णतः विचार करून ऑप्शन फॉर्ममध्ये भरावी,’ असे आवाहन डीकेटीईचे प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी केले.

येथील डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अ‍ॅंड इंजिनीरिंग इन्स्टिट्यूट व श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी इंजिनीअरिंग प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन शिबिर ‘अॅडमिशन+इंजिनिअरिंग वर्ल्ड २०१८’या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

प्रारंभी प्रास्ताविक करताना श्रद्धा इन्स्टिट्यूटचे प्रा. ए. आर. तांबे म्हणाले, ‘प्रवेश प्रक्रियेतील बदलेले नियम विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे असून, आज सीईटीमध्ये १०० गुणांच्यावर गुण पडलेले विद्यार्थी पाच टक्के असून, ८० ते १०० टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांनी डगमगून न जाता गुणवत्ताधारक महाविद्यालयास पसंती दयावी.’

या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व पालकडॉ. कडोले म्हणाले, ‘अभियांत्रिकी महाविद्यालय निवडताना महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेटी देऊन तेथील लॅबोरेटरी, वर्कशॉप, इक्विपमेंट, तज्ज्ञ फॅकल्टी, कॅंपस प्लेसमेंट, सामंजस्य करार, कॉलेजचा मागील वर्षातील रिझल्ट यशिवाय तेथील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृती, आधुनिक सुविधा यांचा सखोल अभ्यास करून योग्य त्या कॉलेजची निवड करावी. अभियांत्रिकीची ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सात ते १९ जूनपर्यंत असून, या कालावधीत उमेदवाराने रजिस्ट्रेशन करावे. प्रवेश प्रक्रियेत केंद्रीय प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या होणार असून, राज्यस्तरावरील प्रवेश हे एमएच सीईटी स्कोअरच्या अधारावर होईल; तसेच १५ टक्के प्रवेश अखिल भारतीय कोट्यातील जेईई मेन्स पेपर वन स्कोरच्या आधारावर होईल.’
 
डीकेटीईच्या प्रा. ए. ए. रायबागी यांनी ‘इंजिनीअरिंग का व कसे व स्पेशलाइज्ड ब्रँचेस’ या विषयावर विस्तृतपणे मार्गदशन केले. प्रा. एस. ए. सौंदत्तीकर यांनी कोर कोर्सेसची माहिती दिली, तर प्रा. डी. एन. ढंग यांनी सर्किट ब्रँचेसची माहिती दिली. प्रा. एस. डी. गोखले यांनी विविध फेऱ्यासाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासंदर्भात व त्या दरम्यान होणारी संभ्रम अवस्था टाळण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रवेशातील टप्प्यांबद्दल माहिती एसएमएसद्वारे मिळविण्यासाठी योग्य पासवर्ड व मोबाईल नंबर नोंदविण्याचे देखील आवाहन केले.

प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांनी खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग विभागामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची, अटींची व निकषांची परिपूर्ण माहिती दिली. डीकेटीईचे डे. डायरेक्टर (प्रशासकीय) डॉ. यु. जे. पाटील यांनी फॅसिलीटेशन सेंटरवर पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व त्यांची कार्यपद्धती आणि चालू वर्षातील इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेतील नियम व त्यातील वेगळेपणा या मुद्द्यांची सखोल माहिती अधोरेखित केली.

तीन तासांहून अधिक चाललेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व पालकांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधीच्या उपस्थित सर्व प्रश्‍नांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे बाराशेहून अधिक विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. एस. जी. कानिटकर यांनी केले. श्रद्धा इन्स्टिट्यूटचे श्री. व्ही. एस. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. ए. के. घाटगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. डे.डायरेक्टर (शैक्षणिक) प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, तसेच सर्व विभागप्रमुख व श्रद्धा अ‍ॅकॅडमीचे प्राध्यापक या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link