Next
‘डीकेटीई’चा अमेरिकेच्या ‘टेनिसी’सोबत सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Wednesday, September 26, 2018 | 11:28 AM
15 0 0
Share this article:

‘डीकेटीई’ व टेनिसी टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ यांच्यात कराराप्रसंगी प्रा. डॉ. डी. व्ही. कोदवडे, टेनिसी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फिलिप ओल्डहॅम. सोबत मान्यवर.इचलकरंजी : येथील डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट आणि अमेरिकेतील प्रसिद्ध टेनिसी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ यांच्यात नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. जगातील नामांकित विद्यापीठामध्ये टेनिसी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचा उल्लेख असू,न शैक्षणिक गुणवत्तेमध्ये दक्षिण अमेरिकेतील हे अग्रगण्य विद्यापीठ आहे.

या सामंजस्य कराराचा उपयोग ‘डीकेटीई’त टेक्स्टाइल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी या शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. या करारानुसार नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी ‘डीकेटीई’चे विद्यार्थी टेनिसी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात एक शैक्षणिक सत्र किंवा एक महिन्यासाठी विशेष शैक्षणिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी जाऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे ‘डीकेटीई’त कार्यरत असणारे प्राध्यापक व पीएचडी संशोधकांना आपल्या संशोधनाच्या कामासाठी टेनिसी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात जाता येणार आहे.
 
‘डीकेटीई’तील संगणक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. व्ही. कोदवडे हे नुकतेच ‘टेनिसी’ विद्यापीठाने ‘संगणकाची कार्यक्षमता’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेस उपस्थित राहिले होते. ही कार्यशाळा झाल्यानंतर प्रा.डॉ.डी.व्ही. कोदवडे यांनी टेनिसी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फिलिप ओल्डहॅम व अधिष्ठता मार्क स्टीफन यांना ‘डीकेटीई’तील शैक्षणिक सोयीसुविधा, शैक्षणिक पद्धत, अत्याधुनिक प्रयोगशाळा व त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक यंत्रसामुग्री, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर असणारे टेक्स्टाइल आणि इंजिनीअरिंग क्षेत्रातील संशोधन व योगदान या साऱ्या गोष्टींचे सादरीकरण केले.

प्रा. डॉ. डी. व्ही. कोदवडे यांनी केलेल्या सादरीकरणाचा अभ्यास करून ‘टेनिसी’ विद्यापीठ आणि डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या दरम्यान शैक्षणिक सामंजस्य करार करण्यासंदर्भात ‘टेनिसी’च्या अध्यक्षांनी मान्यता दिली. हा सामंजस्य करार पुढील पाच वर्षांसाठी असून, यासाठी डॉ. कोदवडे यांना संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील, उपसंचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले.

या कराराबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे यांसह सर्व विश्‍वस्तांनी संचालक डॉ. कडोले व डॉ. कोदवडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search