Next
‘एमटी एज्युकेअर’तर्फे ‘आर प्लस नोटबुक’ सादर
प्रेस रिलीज
Friday, November 23, 2018 | 11:22 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील अग्रेसर प्रशिक्षण कंपनी असलेल्या एमटी एज्युकेअरने अभ्यासाचा एक डिजिटल मार्ग ‘आर प्लस नोटबुक’च्या माध्यमातून तयार केला आहे. पुस्तके, व्यवसाय आणि वर्गपाठातील सर्वोत्कृष्ट भाग वेचण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कल्पकतापूर्ण शिक्षणानुभव देण्यासाठी हे माध्यम डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

‘आर प्लस नोटबुक’ हे पुस्तक उच्चशिक्षित शिक्षकांनी, तसेच इन्स्ट्रक्शनल डिझायनर्सनी उत्कृष्ट डिझाइन व्यावसायिकांच्या मदतीने तयार केले असून, उजळणीच्या वेळी महत्त्वाच्या नोंदी विसरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे उत्तम माध्यम ठरणार आहे. यामध्ये केवळ सर्व संकल्पना व पुस्तकातील गणिती प्रश्नांबरोबरच प्रत्येक प्रश्न व त्याच्या उत्तराला एक स्वतंत्र क्यूआर कोड दिला आहे. विद्यार्थ्याला एखादी संकल्पना आठवणे कठीण जात असल्यास त्याने या अॅपच्या मदतीने त्या प्रश्नाचा क्यूआर कोड स्कॅन केल्यास वर्गशिक्षणसंबंधित प्रश्न सोडवतानाचा व्हिडिओ या नोटबुकमध्ये विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. या संशोधनामुळे परीक्षेपूर्वी अखेरच्या क्षणी संकल्पनाच न आठवल्याने किंवा एखादा प्रश्न न सोडवता आल्याने विद्यार्थ्यांवर येणारे दडपण कमी होण्यास मदत होणार आहे.
 
या विषयी बोलताना एमटी एज्युकेअरचे संस्थापक व कंपनीचे पूर्णवेळ संचालक महेश शेट्टी म्हणाले, ‘पारंपरिक पुस्तकाला आता मल्टी-मिडिया लर्निंग बुकचा पर्याय निर्माण झाला आहे. यात पाठ्यपुस्तक, वही आणि वर्गपाठ, तसेच डिजिटल तंत्रज्ञान या चारही माध्यमांचा सुंदर संयोग जुळून आला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अनुभवासाठी हे उत्तम माध्यम आहे. बालदिनाच्या आठवड्यात ही संकल्पना चाचणी तत्त्वावर बाजारपेठेत सादर करण्यात आली असून, या चाचणीला चांगला प्रतिसाद मिळाला. एमटी एज्युकेअरच्या केंद्रांत हा कल्पक दृष्टीकोन अनुभवण्याठी ज्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली त्यापैकी बऱ्याचजणांनी नववी व दहावीच्या अभ्यासक्रमासाठी (२०१९ ते २०२१ शैक्षणिक वर्षासाठी) हे माध्यम निवडले आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search