Next
‘केलेल्या कामांवर ‘एनडीए’ने ही निवडणूक जिंकली’
रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
प्रेस रिलीज
Thursday, May 23, 2019 | 04:11 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर सन २०१४ची निवडणूक जिंकली; मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ सरकारच्या कामावर २०१९ची ही निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही म्हणणाऱ्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून, जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती, तर तुफान होते हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
 
भाजप प्रणित ‘एनडीए’ला देशभरात ३५०पेक्षा अधिक जागा जिंकत असणारा निकाल कळल्यानंतर आठवले यांच्या बांद्रा येथील संविधान बंगल्यावर ‘रिपाई’च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणी लाडू वाटप करून या महाविजयाचे जल्लोषात स्वागत केले. या जल्लोषात आठवले यांच्यासह त्यांच्या पत्नी सीमा, मुलगा जित हेही सहभागी झाले होते. महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ४२ जागा महायुतीने जिंकत असल्याचा निकाल येत असल्याने आठवले यांनी राज्यातील आंबेडकरी जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. 

‘महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होत आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या अपप्रचाराकडे देशभरातील दलित बहुजन जनतेने दुर्लक्ष केले. मोदींना आणि ‘एनडीए’ला देशभरातील आंबेडकरी जनतेने, दलित बहुजनांनी भरीव मतदान देऊन खंबीर साथ दिल्याबद्दल दलित बहुजन आंबेडकरी जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानतो,’ असे आठवले म्हणाले.

‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसला साथ देणे योग्य नव्हते; तसेच त्यांनी मोदींवर अनावश्यक टीका करायला नको होती. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेससोबत राहण्यापेक्षा ‘एनडीए’मध्ये यायला हवे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्याने ‘एनडीए’सोबत राहिले पाहिजे,’ असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ही ‘एनडीए’चे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे आवाहन केले असल्याची आठवण या वेळी आठवलेंनी केली. ‘देशभरात भाजप आणि ‘एनडीए’ला प्रचंड विजय प्राप्त झाला असून, या विजयाबद्दल मोदी यांनी अत्यंत पद्धतशीरपणे प्रचार करून विरोधकांवर मात केली. त्यांच्या नेतृत्वात ‘एनडीए’ प्रचंड विजय मिळाल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शहा, महाराष्ट्रातील महायुती प्रचंड विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आठवले यांनी अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search