Next
इसापूर प्रकल्पातून पैनगंगेला पाणी सोडण्याची मागणी
BOI
Wednesday, May 08, 2019 | 11:38 AM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणी टंचाईच्या झळांनी नागरिक होरपळून निघाले असून, घडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांना भटंकती करावी लागत आहे. मानवाबरोबरच वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या समस्येवर काही अंशी मात मिळवण्यासाठी ईसापूर प्रकल्पातून पैनगंगेत पाणी सोडण्यात यावे,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांनी केली आहे. 

आशिष सकवानहिमायतनगर तालुक्यातील कामारी, विरसनी, दिघी, घारापूर, टेंभूर्णी, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली आदी ठिकाणांसह पैनगंगा नदी काठावरील जनता पाण्यासाठी व्याकूळ झाली आहे. पैनगंगेवर अवलंबून असलेल्या सर्वच गावांच्या सार्वजनिक नळयोजना पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. नागरिक पाण्यासाठी बेजार झाले असून, पाळीव प्राणी, गुरा-ढोरांसाठी शेतकर्‍यांना कूपनलिकेच्या पाण्यावर गुजराण करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गाव-वस्तीकडे धाव घेत आहेत. 

एकूणच या भागात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनला असून, याकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ईसापूर प्रकल्पातून पैनगंगेत पाणी सोडण्याची मागणी सकवान यांनी केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 73 Days ago
Hope , the authorities take notice . Vote them out .
0
0

Select Language
Share Link
 
Search