Next
‘गरीब महिलांच्या जीवनात ‘उज्ज्वला’मुळे बदल’
प्रेस रिलीज
Monday, April 23 | 04:20 PM
15 0 0
Share this story

‘उज्ज्वला दिवस’ कार्यक्रमात नवीन गॅसजोडणी वितरण करताना खासदार अनिल शिरोळे. शेजारी राजेश पांडे, संजयकुमार चौबे, दिनेश भालेदार, राजन पत्तन, एस. पी. सिंग, एस. के. साहू सुमन कुमार आणि गोपाल शंकर.

पुणे :
‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे गरीब, युवक आणि समाजातील सर्व घटकांसाठी समर्पित सरकार असून, उज्ज्वला योजनेद्वारे गोरगरीब वर्गातील महिलांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडले आहेत,’ असे प्रतिपादन  खासदार अनिल शिरोळे यांनी केले.

केंद्र सरकारतर्फे देशभरात ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत ‘उज्ज्वला दिवस’ हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात नवीन गॅसजोडणी वितरण करण्यात आले. या प्रसंगी ‘एमएनजीएल’चे संचालक राजेश पांडे, भारत पेट्रोलियमचे संजयकुमार चौबे, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, हिंदुस्तान पेट्रोलियमचे राजन पत्तन, ‘ओएनजीसी’चे एस. पी. सिंग, एस. के. साहू सुमन कुमार आणि गोपाल शंकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात अर्चना कांबळे, सोनाक्षी दहिभाते आदी लाभार्थींनी उज्ज्वला योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले.

देशातील प्रत्येक नागरिकाला गॅस, वीज, स्वत:चे घर मिळवून देणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता असल्याचे नमूद करून शिरोळे म्हणाले, ‘जनधन योजनेद्वारे भ्रष्टाचाराला पायबंद बसला असून, नागरिकांना त्यांच्या हक्काचे पैसे थेट बँकेत जमा होऊ लागले आहेत. उज्ज्वला योजनेला मिळालेला देशभरातील प्रतिसाद बघता ही एक लोकचळवळ झाली आहे. या चळवळीच्या माध्यमातून पुणे शहराला केरोसीनमुक्त करायचे आहे.’

‘एमएनजीएल’चे संचालक पांडे म्हणले, ‘पूर्वी गॅस कनेक्शनसाठी लांबच लांब रांगा लागायच्या; पण मोदी सरकारच्या काळात फक्त तीन वर्षांत ३.५ कोटी हून अधिक कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.’

पुणे जिल्ह्यातील उज्ज्वला योजनेच्या नोडल अधिकारी अनघा गद्रे म्हणाल्या, ‘आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ६७ हजार जोडण्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी मागील आर्थिक वर्षात ३७ हजार ९७० जोडण्याचे वाटप करण्यात आले आहे. एकूण जोडण्यांपैकी ४४ टक्के जोडण्या या एससी-एसटी वर्गातील महिलांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ३.०८ लाख लोकांनी गॅसची सबसिडी सोडली आहे. आज उज्ज्वला दिवसांतर्गत पुणे जिल्ह्यात एकूण ९४० नवीन जोडण्याचे वितरण करण्यात आले आहे. अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, एससी-एसटी प्रमाणपत्रधारक, अति मागास जातीतील नागरिक हेही या योजानसे पात्र आहेत. संपूर्ण जिल्ह्यात १८० वितरक असून, त्यापैकी नागरिकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी या वितरकांशी संपर्क साधावा.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link