Next
झाकीर हुसैन यांना ‘पु. ल. स्मृती सन्मान’ जाहीर
‘पुलोत्सवा’तील पुरस्कारांची घोषणा
प्रेस रिलीज
Wednesday, November 14, 2018 | 03:42 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिक यांच्या वतीने आणि स्क्वेअर वनच्या सहयोगाने १७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पुलोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पु. ल. स्मृती सन्मान उस्ताद झाकीर हुसैन, जीवनगौरव पुरस्कार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला असून, डॉ. जयंत नारळीकर आणि शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान या महोत्सवात केला जाणार आहे,’ अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नायनीश देशपांडे, मयूर वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.

झाकीर हुसैनया वेळी सीएमडी पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट आणि नाट्य परिषदेचे पुणे येथील अध्यक्ष मेघराज राजेभोसले, स्टोरी टेलचे प्रसाद मिरासदार, ढेपे वाडाचे नितीन ढेपे उपस्थित होते.

‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्षाला आठ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पुलोत्सवात सहा मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पुणेरी पगडी, उपरणं, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये असे आहे.

पंडित हृदयनाथ मंगेशकर१७ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे पुलोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सायंकाळी सात ते रात्री ८.३० या वेळेत ‘पुलं’च्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा दृक्श्राव्य कार्यक्रम ‘बहुरूपी पु. ल.’ सादर केला जाईल. रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत ‘पुलंचे पोष्टिक जीवन’ हा ‘पुलं’च्या पत्रलेखनावर आधारित कार्यक्रम होईल.

१८ नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी एक यावेळेत टिळक रस्त्यावरील ‘मसाप’ येथे ‘भाषाप्रभू पु. ल.’ हा परिसंवाद होईल. यात डॉ. आशुतोष जावडेकर, रेखा इनामदार-साने, गणेश मतकरी यांचा सहभाग असेल. मंगल गोडबोले सूत्रसंचालन करतील. सकाळी १० ते १०.३० या वेळेत प्रभात रोडवरील अर्काइव्ह थिअटरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होईल. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांची निर्मिती असलेला ‘पुलं’च्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल.      
 
डॉ. जयंत नारळीकर१९ नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी एक यावेळेत टिळक रस्त्यावरील ‘मसाप’ येथे ‘चित्रपट नाटकातील पु. ल.’ हा परिसंवाद होईल. यात माधव वझे, आनंद माडगुळकर, राजदत्त आदींचा सहभाग असेल. राजेश दामले सूत्रसंचालन करतील. अर्काइव्ह चित्रपटगृहात दिवसभर चित्रपट सुरू असतील. २० नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत ‘देणे पुलंचे’ हा परिसंवाद होईल. यात प्रा. मिलिंद जोशी, दिनकर गांगल, डॉ. रामचंद्र देखणे, ज्योती सुभाष सहभागी होतील.

२१ नोव्हेंबरला सकाळी १० ते १०.३० या वेळेत बालगंधर्व कलादालनात ‘पुलकित रेषा’ या महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या ‘पुलं’विषयक हास्यचित्रे व अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शि. द. फडणीस यांच्या हस्ते होईल. त्यानंतर तेथेच ‘व्यंगचित्रांची दुनिया’ या परिसंवाद व प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे डॉ. विकास आमटे यांना डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येईल. सायंकाळी सात ते रात्री ८.३० या वेळेत ‘कवितांजली’ हा कार्यक्रम होईल. रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत ‘सफर चंद पु. ल.’ या कार्यक्रम होईल.

शि. द. फडणीस२२ नोव्हेंबरला सकाळी १० ते ११ या वेळेत बालगंधर्व कलादालनात ‘पु. ल.’ हा लघुपट दाखविला जाईल. सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत तेथेच ‘पुलंचे सामाजिक भान’ या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात डॉ. जयंत नारळीकर यांना द. मा. मिरासदार यांच्या हस्ते विशेष सन्मान प्रदान केला जाईल. सायंकाळी सात ते रात्र ८.३० या वेळेत ‘पुलं’प्रेमींना माहित नसलेल्या साहित्यावर आधारित ‘अपरिचित पु. ल.’ या कार्यक्रम होईल. रात्री ९.३० ते ११.३० वाजता तरुण पिढीला ‘पुलं’ची आठवण करून देणारा ‘पुलब्रेशन’ हा कार्यक्रम होईल.

कौशिकी चक्रवर्ती२३ नोव्हेंबरला सकाळी १० ते ११ या वेळेत बालगंधर्व कलादालनात ‘कवितांजली’ हा लघुपट सादर केला जाईल. सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत इथेच ‘परफॉर्मर पु. ल.’ या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात शि. द. फडणीस यांना महेश एलकुंचवार यांच्या हस्ते विशेष सन्मान प्रदान केला जाईल. सायंकाळी सात ते ८.३० या वेळेत ‘गुण गाईन आवडी’ या कार्यक्रम होईल. रात्री ९.३० वाजता आजच्या जमान्यातील ‘पुलं’च्या व्यक्तिरेखांचे अनोखे दर्शन देणारा ‘भा. डी. पा. चे वल्ली’ हा कार्यक्रम होईल.

२४ नोव्हेंबरला सकाळी बालगंधर्व कलादालनात ‘या सम हा’ हा लघुपट दाखविला जाईल. सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत ‘आमचे पीएल’ हा कार्यक्रम होईल. सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात ५.३० वाजता कौशिकी चक्रवर्ती यांना कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते तरुणाई सन्मान पुरस्कार प्रदान केला जाईल. सायंकाळी सात वाजता ‘बैठकीची लावणी’ कार्यक्रम होईल. रात्री ९.३० वाजता ‘एक झुंज वाऱ्याशी’ हे नाटक होईल.

डॉ. विकास आमटे२५ नोव्हेंबरला बालगंधर्व कलादालनात सकाळी १० ते ११ या वेळेत ‘बिगरी ते मॅट्रिक’ हा लघुपट दाखविला जाईल. सकाळी ११ ते दुपारी एक यावेळेत ‘पुलंचे शब्द-गाणे’ या कार्यक्रम होईल. सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात बालकलाकारांनी सादर केलेले ‘पु. ल. आजोबा’ हे नाटक सादर केले जाईल. सायंकाळी सात वाजता उस्ताद झाकीर हुसैन यांना डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते ‘पु. ल. स्मृती सन्मान’ प्रदान केला जाईल. रात्री ९.३० वाजता ‘तबलानवाज’ हा लघुपट महोत्सव होईल.

महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, विनामूल्य प्रवेशिका वाटप १४ नोव्हेंबरपासून सकाळी नऊ ते ११ आणि सायंकाळी पाच ते आठ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search