Next
डॉ. पटवर्धन मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी गाइड
BOI
Tuesday, January 02 | 03:16 PM
15 0 0
Share this story

डॉ. निधी पटवर्धनरत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निधी पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी गाइड म्हणून मान्यता मिळाली.

एमफीलचे दोन विद्यार्थी, तर पीएचडीच्या चार विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करणार आहेत. सध्या मुंबई विद्यापीठातील एमफीलची रीना शेवाळे ही प्रथम विद्यार्थिनी प्रविष्ट झाली असून, ‘महात्मा फुले यांच्यावरील चारित्र्यात्मक नाटके’ या विषयावर डॉ. पटवर्धन मार्गदर्शन करत आहेत.

डॉ. पटवर्धन यांचे अनेक शोधनिबंध मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा ‘पिंटी’ हा बालकथासंग्रह स्वा. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एमएच्या अभ्यासक्रमात बालकुमार साहित्य या अभ्यासपत्रिकेत समाविष्ट झाला आहे. यावर्षी बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना १७ फेब्रुवारीला कथा व निवेदन या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

लवकरच त्यांचा ‘चिंतनफुले’ हा ललितलेख संग्रह प्रकाशित होणार आहे. डॉ. पटवर्धन यांच्या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link