Next
खासदार रामदास तडस यांची नवोदय विद्यालयाला भेट
प्रेस रिलीज
Monday, September 11, 2017 | 06:01 PM
15 0 0
Share this article:

जवाहरलाल नवोदय विद्यालय परिसराची पाहणी करताना खासदार रामदास तडसवर्धा : लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी नजीकच्या सेलू (काटे) येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयाला अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून प्राचार्य आर. नागभूषण यांच्याशी येथील विविध समस्यांवर चर्चा केली.

मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे काम गेल्या चार वर्षांपासून ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून कंत्राटदाराच्या व केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या असमन्वयामुळे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याचे खासदार तडस यांच्या निदर्शनास आले.

या विषयावर नागपूर येथील केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शेकोकार यांच्याशी संपर्क साधून अपूर्ण बांधकामाचा संक्षिप्त अहवाल तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना खासदार तडस यांनी दिल्या; तसेच या विषयी १२ सप्टेंबरला सर्व लेखी माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यालय परिसरातील रस्त्यांची समस्या, हायमास्ट लाईट, ग्रंथालयातील साहित्य, पिण्याच्या पाण्याची समस्या, सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा, संरक्षण भिंत आदी महत्त्वाच्या कामाबाबत सविस्तर अहवाल त्यात करून सादर करण्याचे निर्देश खासदार तडस यांनी प्राचार्यांनी दिले.

विद्यालयाच्या भेटीनंतर जवाहर नवोदय विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा वर्धाचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यालयाच्या सर्व समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या. या भेटीदरम्यान तडस यांनी येथील स्वयंपाकगृह, संरक्षण भिंत, सोलर ऊर्जा यंत्रणा, भोजन कक्ष आदी ठिकाणची पाहणी केली. पाहणी दौऱ्याचा अहवाल नवोदय विद्यालयाचे महाप्रबंधक नोयडा, उपयुक्त पुणे तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सादर करण्यात येणार असून वर्धा नवोदय विद्यालय परिसरात पायाभूत सुविधा आणि रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार तडस यांनी दिली.

या वेळी ‘नवोदय’चे प्रशासकीय अधिकारी, विषय शिक्षक तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search