Next
रॉयल एनफिल्ड ‘क्लासिक ५०० पेगॅसस’ भारतात दाखल
प्रेस रिलीज
Monday, June 04, 2018 | 04:50 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सातत्याने उत्पादन सुरू असलेला सर्वांत जुना मोटरसायकल ब्रॅंड रॉयल एनफिल्डने क्लासिक ५०० पेगॅसस या मोटरसायकल्सची लिमिटेड एडिशन भारतात सादर केली आहे. रॉयल एनफिल्डच्या ब्रिटनमधील कारखान्यात दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्माण करण्यात आलेल्या आणि आख्यायिका होऊन गेलेल्या आरई/डब्ल्यूडी १२५ फ्लायिंग फ्लिआ मोटरसायकलवरून प्रेरणा घेऊन ‘पेगॅसस’ तयार करण्यात आली आहे.

या मोटरसायकलची जगभरात केवळ एक हजार युनिट्स उपलब्ध आहेत. भारतामध्ये सर्व्हिस ब्राउन या युद्धाचा कालखंड दर्शवणाऱ्या रंगात या २५० मोटरसायकल्स आणल्या आहेत. मोटरसायकलची किंमत दोन लाख ४९ हजार २१७ रुपये (मुंबईतील ऑन-रोड किंमत) असून, या केवळ वेबसाइटद्वारे १० जुलै २०१८पासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. स्मरणोत्सवाचा भाग म्हणून तयार करण्यात आलेल्या या २५० लिमिटेड एडिशनमधील प्रत्येक मोटरसायकलसोबत खास तयार केलेले लष्करी धाटणीचे कॅनव्हासचे पॅनियर्स दिले जाणार असून, त्यावर पेगॅससचा लोगो असेल. याशिवाय एक हेल्मेट आणि पेगॅसस कलेक्शनमधील एक टी-शर्टही यासोबत दिला जाणार आहे.

लिमिटेड एडिशन क्लासिक ५०० पेगॅसस सादर करताना रॉयल एनफिल्डचे अध्यक्ष रूद्रतेज (रुडी) सिंग म्हणाले, ‘पेगॅसस पॅराशुट रेजिमेंटशी असलेला संबंध रॉयल एनफिल्डचा इतिहास मोटरसायकलिंगच्या क्षेत्रात किती खोलवर रुजलेला आहे याची आणखी एकदा आठवण करून देतो. आमच्या अन्य काही लष्करावरून प्रेरित मोटरसायकल्सच्या प्रकारांप्रमाणेच क्लासिक पेगॅसस एडिशनही संग्रही ठेवण्याजोगी होईल, असा विश्वास मला वाटतो. आम्ही लष्कराचा दणकटपणा असलेल्या वैविध्यपूर्ण मोटरसायकल्स ‘मेड लाइक अ गन’ १९०१ सालापासून तयार करत आहोत आणि अशी काही पडद्याआड लपलेली रत्ने आणि कहाण्या आमच्या मोटरसायकल्समार्फत सर्वांसमोर आणत राहू.’

फ्लायिंग फ्लिआची कामगिरी साजरी करण्यासाठी आणि तिच्याबद्दलच्या आजपर्यंत न सांगितलेल्या असामान्य कथा सर्वांना सांगण्यासाठी रॉयल एनफिल्डने ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयासोबत तसेच पॅराशूट रेजिमेंटसोबत अधिकृत करार करून क्लासिक पेगॅससची निर्मिती केली. रॉयल एनफिल्डच्या वैश्विक उत्पादन धोरण आणि औद्योगिक रचना विभागाचे प्रमुख मार्क वेल्स स्पष्ट म्हणाले की,  ‘संरक्षण मंत्रालयासोबत दृढ संबंध ठेऊन काम करणे खरोखरच महत्त्वाचे होते. त्यामुळे सुमारे १८ महिन्यांपूर्वी आम्ही पॅराशूट रेजिमेंटशी संपर्क साधला आणि यातून खूप चांगला सहयोग निर्माण झाला. या नव्या क्लासिक ५०० पेगॅसस मोटरसायकल्समध्ये खूप मोठा इतिहास आणि रॉयल एनफिल्डचा वारसा सामावलेला आहे. हे केवळ रॉयल एनफिल्डच करू शकत होते.’

‘लष्करी मोटरसायकल्स आतापर्यंत अनेक ब्रॅंड्सने निर्माण केल्या आहेत; पण फ्लायिंग फ्लिआ केवळ रॉयल एनफिल्डने केली आहे. आम्हाला या प्रेरणेचे सर्वाधिक अस्सलतेने पुनरुज्जीवन करायचे होते. त्यामुळे आम्ही बारीक तपशिलांवरही खूप लक्ष दिले आहे. मोटरसायकल विमानात लोड केली जात असताना तिच्या गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू दर्शवणारी एक पिवळी पट्टी इंजिन कव्हरवर होती, तीदेखील आम्ही पेगॅससमध्ये ठेवली आहे,’ असे त्यांनी सांगितले.

या विशेष एडिशनमध्ये केवळ एक हजार मोटरसायकल्स जगभरात उपलब्ध होणार आहेत आणि यातील केवळ २५० भारतात उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक क्लासिक पेगॅसस मोटरसायकवर मरून आणि निळ्या रंगातील पेगॅसस चिन्ह (एम्ब्लेम) असून, पॅराशूट रेजिमेंटचे अधिकृत चिन्ह फ्युएल टँकवर एका व्यक्तिगत स्टेन्सिल्ड सीरियल क्रमांकासह आहे. रॉयल एनफिल्डचे प्रसिद्ध ‘मेड लाइक अ गन’ हे वाक्य बॅटरी बॉक्सवर असून मोटरसायकलच्या लष्करी परंपरेचे हे आणखी एक द्योतक आहे. हे मोटरसायकलवर बऱ्याच काळानंतर वापरण्यात आले आहेत. अस्सलता जिवंत ठेवत, पेगॅसस मोटरसायकलवरील खुणा या २५०व्या एअरबोर्न लाइट कंपनीने वापरलेल्या अस्सल वर्ल्ड वॉर टू फ्लाइंग फ्लिआवरील खुणांवरून बेतलेल्या आहेत. या खुणा सध्या कंपनीच्या यूके टेक्नोलॉजी सेंटरमधील अधिकृत संग्रहात आहेत.

नवीन लिमिटेड एडिशन ‘क्लासिक ५०० पेगॅसस’च्या किंमतीबद्दल रॉयल एनफिल्डचे भारतातील बिझनेस प्रमुख शाजी कोशी म्हणाले, ‘क्लासिक पेगॅससच्या २५० मोटरसायकल्स १० जुलै रोजी केवळ रॉयल एनफिल्डच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. प्रत्येक मोटरसायकलसोबत कॅनव्हास पॅनिअर्स, हेल्मेट आणि एक पिगॅसस टी-शर्ट दिला जाईल. इच्छुक ग्राहकांची ऑनलाइन नोंदणी आमच्या वेबसाइटवर आजपासूनच सुरू होईल.’

या प्रतिष्ठित मोटरसायकल परंपरेपासून प्रेरणा घेत उत्पादनांची एक मालिकाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. शर्ट्स, टी-शर्ट्स, कॅप्स, लेपल पिन्स, बॅग्ज, हेल्मेट्स, मर्यादित उत्पादन असलेले कपडे आणि अॅक्सेसरीज यांवरही अधिकृत लष्करी चिन्ह आणि पेगॅससचा एम्ब्लेम असेल.

लिमिटेड एडिशनमधील प्रत्येक मोटरसायकलसोबत लष्करी शैलीतील कॅन्व्हास पॅनिअर्सचा एक संच दिला जाणार आहे, यावर पेगॅससचा लोगो असेल. प्रत्येक मोटरसायकलवर लष्करी मोटरसायकलच्या अस्सल खुणा असतील. तपकिरी हॅण्डलबार ग्रिप्स, एअर फिल्टरभोवती ब्रास बकल्स असलेला चामडी पट्टा, काळ्या रंगातील सायलेन्सर्स, रिम्स, किकस्टार्ट, पेडल्स आणि हेडलाइट बेझल्स हे सर्व काही मोटरसायकलला त्या काळातील लूक देण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे. याशिवाय, मोटरसायकलला शोभतील अशा अस्सल मोटरसायकल अॅक्सेसरीजची श्रेणी ग्राहकांना खरेदी करता येईल.

गाडी खरेदी करण्यासाठी वेबसाइट :  https://royalenfield.com/pegasus
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link