Next
‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे अडीच वर्षांत शंभर यकृतांचे प्रत्यारोपण
BOI
Thursday, September 06 | 01:32 PM
15 0 0
Share this story


पुणे : येथील ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ने नुकतेच आपल्या डेक्कन येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शंभरावे यकृत प्रत्यारोपण केले. हे प्रत्यारोपण ‘लिव्हर सिरॉसिस’ने ग्रस्त सांगली आटपाडी येथील एका ४८वर्षीय पुरूष रूग्णावर करण्यात आले. यकृत प्रत्यारोपण यशस्वी करणार्याि तज्ज्ञांच्या समुहात ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’चे हेपॅटोबिलियरी व यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. बिपीन विभूते, डॉ. अनिल वैद्य, डॉ. दिनेश झिरपे, लिव्हर आयसीयुचे मुख्य सल्लागार डॉ. चेतन पांडे, प्रत्यारोपण भूलतज्ञ डॉ. मनिष पाठक, डॉ. दिनेश बाबू, यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक  डॉ. शैलेश साबळे, समन्वयक अरूण अशोकन, अमन, राहुल तांबे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये यांचा समावेश होता.

डॉ. बिपीन विभुते म्हणाले, ‘या शंभराव्या प्रत्यारोपणात यशाचे प्रमाण हे ८९ टक्के आहे. आमच्या या प्रवासामध्ये आव्हानात्मक यकृत प्रत्यारोपणाबरोबरच काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. मुत्रपिंड-स्वादुपिंड प्रत्यारोपण आणि महाराष्ट्रात करण्यात आलेल्या सर्वाधिक पिडियाट्रिक(बालकांमधील) यकृत प्रत्यारोपण यांसारख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. याबरोबरच आम्ही एकाच वेळी यकृत, मुत्रपिंड आणि स्वादुपिंडाचेही प्रत्यारोपण केले आहे. ८४ वर्षीय ज्येष्ठ दात्याचे यकृत काढून गरजू रूग्णावर प्रत्यारोपण केले आहे, हे राज्यातील अशा प्रकारचे बहुधा पहिलेच प्रत्यारोपण असेल. प्रशिक्षित वैद्यकीय टीम, दर्जेदार वैद्यकीय उपचार पध्दती आणि किफायतशीर दरात सर्व आवश्यक सोयी सुविधांची उपलब्धता यामुळे सह्याद्री हॉस्पिटलमधील यकृत प्रत्यारोपणाच्या यशस्वितेचे प्रमाण अधिक आहे. जगभरात देखील यकृत प्रत्यारोपणातील यशस्वितेचे प्रमाण ९० टक्के आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘यकृत प्रत्यारोपणानंतर सुरूवातीचे काही दिवस रुग्णाची खूप काळजी घ्यावी लागते, त्याची उत्तम सोय येथे आहे. यकृत प्रत्यारोपणाचा खर्च कमी करण्यातही आम्ही यश मिळवले आहे. येथे १५ ते १८ लाख रुपयांमध्ये हे प्रत्यारोपण होते. गरीब रुग्णांना मुख्यमंत्री निधी, अन्य आर्थिक मदत योजनांद्वारे मदत मिळवून दिली जाते, हॉस्पिटलही अगदी माफक शुल्क आकारणी करते. पैशाअभावी उपचार रोखले जात नाहीत. नुकत्याच एका १५ वर्षांच्या गरीब रुग्णाचे यकृत प्रत्यारोपण अगदी माफक शुल्कात करून, त्याच्या नंतरच्या औषधोपचारांची आर्थिक तरतूदही हॉस्पिटलने केली आहे. अवयवप्रत्यारोपणाविषयी जागरुकता वाढणेही आवश्यक आहे.’   

याबद्दल बोलताना ‘सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स’चे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. सुनिल राव म्हणाले, ‘केवळ अडीच वर्षांच्या कालावधीत शंभरावे यकृत प्रत्यारोपण हा महत्त्वाचा टप्पा पार करणे, हा सर्वांकरिता एक अभिमानाचा क्षण आहे. यामुळे अनेकांना नवीन जीवन मिळाले याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. डॉ. विभुतेंच्या नेतृत्वाखाली असलेली प्रशिक्षित वैद्यकीय टीम, दर्जेदार वैद्यकीय उपचार पध्दती आणि किफायतशीर दरात सर्व आवश्यक सोयी सुविधांची उपलब्धता या सर्व गोष्टींचा या प्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा आहे. सर्वांपर्यंत सुविधा पोहोचाव्यात याकरता आम्ही औरंगाबाद व नाशिक येथेदेखील यकृत प्रत्यारोपण केंद्र सुरू केले आहे; तसेच सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, बारामती, अहमदनगर, इंदापूर येथील रूग्णांनादेखील लिव्हर ओपीडीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.’

डॉ. सुनिल राव पुढे म्हणाले, ‘अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबियांना अवयवदानाच्या महान कार्याबद्दल सलाम करत असतानाच, आम्ही आमच्या कर्मचार्यांूचे अभिनंदन आणि झेडटीसीसी आणि ट्रॅफिक पोलिस यांचे आभार मानतो. या सर्वांचाच या प्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा आहे.’

प्रत्यारोपण भूलतज्ञ डॉ. मनिष पाठक म्हणाले, ‘अद्ययावत सुविधा, समर्पित डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी तसेच यकृत आजारांसाठी अखंड वैद्यकीय सेवा यामुळे हे यश शक्य झाले आहे. डॉ. बिपीन विभुते, डॉ. दिनेश बाबू, डॉ. दिनेश झिरपे, डॉ. शैलेश साबळे, डॉ. संदीप कुलकर्णी आणि प्रशिक्षित कर्मचारी व सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा याबरोबरच समर्पित लिव्हर आयसीयु व तज्ञांची टीम यामुळे रूग्णांना योग्य मार्गदर्शन मिळते;तसेच शस्त्रक्रियेनंतर रूग्ण जलद व लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी येथे रिहॅब टीम कार्यरत आहे.’

‘सह्याद्री हॉस्पिटल्स’च्या डेक्कन, हडपसर, नगररोडचे युनिट हेड डॉ. केतन आपटे म्हणाले, ‘मी आमच्या डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन करतो, ज्यांनी फक्त प्रत्यारोपण यशस्वी केले नसून, रूग्ण लवकरात लवकर बरा व्हावा यावर देखील लक्ष केंद्रीत केले. हा महत्त्वाचा टप्पा गाठला असला, तरी यापुढे अवयवदान जागृतीसाठी आम्ही अधिक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवू. दाते आणि त्यांचे कुटुंबियांना आम्ही सलाम करतो. नुकत्याच रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131 बरोबर सहयोग करून जगातील सर्वांत मोठ्या अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेत सहभाग नोंदविला. आठ तासांत सर्वाधिक अवयव दान प्रतिज्ञेसाठी या उपक्रमाची नोंदणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. आम्ही या उपक्रमात सहभागी झालो याचा आम्हाला आनंद आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link