Next
‘सिस्का’तर्फे ‘युनिब्लेड- युटी१०००’ची घोषणा
प्रेस रिलीज
Friday, June 08, 2018 | 02:00 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘सिस्का पर्सनल केअर’तर्फे गुळगुळीत दाढीसाठी तसेच दाढी कमी करण्यासाठी ‘युनिब्लेड-युटी १०००’ या नवीन उपकरणाची घोषणा करण्यात आली. ‘युनिब्लेड’ हे अशाप्रकारचे पहिलेच उपकरण असून, त्याद्वारे ग्राहकांना संपूर्ण दाढी कीट वापरण्याऐवजी गुळगुळीत दाढी करणे, दाढी कमी करणे, तसेच दाढीसंदर्भातील इतर गोष्टी करता येणार आहेत.
 
‘सिस्का युनिब्लेड’ या उपकरणाची निर्मिती अत्याधुनिक तंत्राद्वारे करण्यात आली असून, त्याद्वारे पुरुषांना दाढीचा अनोखा आनंद मिळणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्याची निगाही राखली जाणार आहे. या उपकरणाला दोन्हीकडून पाते असल्यामुळे त्वचेवरील दाढी करण्याचे काम सोपे होणार आहे; तसेच त्वचा ओली किंवा कोरडी असतानाही दाढी करणे शक्य होणार आहे. अशाप्रकारे पुरुषांना दाढीचा आनंददायक अनुभव मिळणार असून, लांब दाढी असणाऱ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे.

‘सिस्का युनिब्लेड’ हे उपकरण वापरायला सोपे आणि त्वचेची काळजी घेणारे आहे. यातील एकाच ब्लेडच्या पात्याद्वारे ग्राहकांना दाढी करता येणार आहे, तसेच ती छोटीही करता येणार आहे. या उपकरणाला केस विंचरण्यासाठी विशेष कंगव्याची सुविधा देण्यात आली आहे. अवघ्या दीड तासांच्या बॅटरी चार्जिंगद्वारे ग्राहकांना सुमारे एक तासासाठी दाढीचा अनुभव घेता येणार आहे. ‘फ्लिपकार्ट’ या ई-कॉमर्स साइटवर ‘युनिब्लेड-युटी१०००’ हे उपकरण उपलब्ध करण्यात आले असून, त्याचे मूल्य एक हजार ८९९ रुपये एवढे आहे; तसेच हे उपकरण सध्या देशभरातील विविध ऑफलाइन स्टोअर्समध्येही ग्राहकांना मिळणार आहे.

या उपकरणाबद्दल ‘सिस्का’ समूहाचे कार्यकारी संचालक गुरुमुख उत्तमचंदानी म्हणाले, ‘ग्राहकांना उत्तम लाइफस्टाइलचा अनुभव देण्यासाठी अत्युत्तम तंत्रज्ञानाद्वारे ‘सिस्का’तर्फे विविध उपकरणांची निर्मिती केली जाते. ‘युनिब्लेड युटी-१०००’ हे उपकरण खास करून पुरुषांच्या गरजा लक्षात घेऊन निर्मिण्यात आले आहे. बहुतेक पुरुषवर्ग दाढीसाठी विविध उपकरणे वापरतो. त्यामुळे पुरुषांच्या दाढीसाठी आम्ही एकच उपकरण असे निर्मिले की ज्याद्वारे त्यांना चेहऱ्यावरील दाढीही कमी तसेच गुळगुळीत दाढीचाही अनुभव घेता येईल.’

दाढी करणे, तसेच दाढी कमी करण्यासाठी एकच ब्लेड, कंगव्याची विशेष सुविधा, अवघ्या ९० मिनिटांमध्ये बॅटरी चार्ज होणार, हे उपकरण ६० मिनिटे चालणार, एलईडी लाइट इंडिकेटर, उत्तम लुक आणि अनुभव ही ‘युनिब्लेड’ची वैशिष्ट्ये आहेत.

‘सिस्का पर्सनल केअर’तर्फे फेब्रुवारी २०१८मध्ये पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कंपनीतर्फे पहिल्या टप्प्यामध्ये पुरुष आणि महिलांसाठी तब्बल ३० उपकरणांची निर्मिती करण्यात आली. ग्राहकांची गरज ओळखून उत्तम दर्जाची, तसेच उत्कृष्ट तंत्रज्ञान लाभलेल्या उपकरणांची निर्मिती करण्याकडे या कंपनीचा भर आहे. ‘सिस्का’कडे सध्या स्त्री आणि पुरुष विभागासाठी वीस प्रकारची वेगवेगळी उपकरणे असून, या कंपनीचे देशभरात सात हजारांहून अधिक विक्रेते आहेत.

सिस्का पर्सनल केअर’बद्दल :
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन ‘सिस्का पर्सनल केअर’तर्फे पुरुष आणि स्त्रियांसाठी दाढी तसेच सौंदर्यविषयक उत्तमोत्तम उपकरणांची निर्मिती केली जाते. या उपकरणांचा दर्जा उत्तम असतो, तसेच ती किफायतशीरही असतात. पुरुष आणि स्त्रियांसाठी विनात्रासदायक अनुभव देणारी उपकरणे या कंपनीतर्फे बनवली जातात. ग्राहकांना आपल्या इच्छेनुसार चेहऱ्याची स्टाइल ठरविण्याचे स्वातंत्र्य ‘सिस्का’च्या उपकरणांद्वारे मिळते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link