Next
वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास
BOI
Friday, June 28, 2019 | 10:38 AM
15 0 0
Share this article:

लोकगीतांची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. लिखितपेक्षा याचे स्वरूप मौखिक असते. लोकगीतांमधून लोकजीवनाचे, संस्कृतीचे प्रतिबिंब पडते. त्यामुळे लोकगीतांमधून संस्कृती व समाजाचा अभ्यास करणे शक्य होते. प्रतिमा इंगोले यांनी वऱ्हाडी लोकगीतांच्या आधारे वऱ्हाडी समाजजीवनाचा अभ्यास केला. ‘वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास’मधून त्यांनी याचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

लोकगीताचे स्वरूप व वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी ‘लोकसाहित्य’ या शब्दाची फोड करून वऱ्हाडी भाषेतील त्याचे अस्तित्त्व सांगितले आहे. लोकगीत म्हणजे काय, त्याची व्याप्ती-व्याख्या, लोकगीत व लौकिकगीताचे स्वरूप व भेद, लोकगीत व स्त्रीजीवन, पूर्वपरंपरा, लोकगीत व लोकभाषा, लोकगीताची आविष्कार शैली विशद केली आहे. 

पुढे वऱ्हाडी लोकगीतांचे लग्नगीत, डहाकागीते, पाळणा गीते, अंगाई गीते, भुलाई गीते आदी ठळक प्रकार यात असून, त्याबद्दल निष्कर्षही दिले आहेत. लोकगीतातून घडणारे समाजदर्शन, सांस्कृतिक दर्शन यातून घडविले आहे. 

पुस्तक : वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास
लेखक : डॉ. प्रतिमा इंगोले
प्रकाशक : सोनल प्रकाशन
पाने : ३०४
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
का.रा.चव्हाण . About 73 Days ago
पुस्तक समाभिमुख उपयुक्त असे आहे.
0
0
BDGramopadhye About 108 Days ago
Valuable addition to the studies of traditnal , folklore-type literature. They are important for the studies of societies , communities and regions . Librarians -- please note . To store and preserve such literature is your area of responsibity .o
0
0

Select Language
Share Link
 
Search