Next
‘रिलायन्स’च्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
BOI
Friday, June 28, 2019 | 12:50 PM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : येथील रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा शासकीय रुग्णालय व हातखंबा येथील रिलायन्स पेट्रोल पंप यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायन्स पेट्रोल पंप येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

या शिबिरामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयमार्फत ट्रक चालक, वाहक व शेतकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण यांची तपासणी करून औषध पुरवठा करण्यात आला. या प्रसंगी ट्रकचालक, क्लीनर यांना एचआयव्ही एड्सबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली; तसेच कर्करोगाबद्दल प्राथमिक परीक्षण व तंबाखू बंदीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, नर्स प्राजक्ता जक्कर, समुपदेशक प्राची जाधव, समुपदेशक रामेश्वर मेत्रे, आयसीटीसी समुपदेशक सतीश कांबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शीतल पोवार यांनी रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले. 


या शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बोल्डे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. रिलायन्स पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक रविराज बने यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, कार्यक्रम सहायक विनोद गवाणकर, छायाचित्रकार सचिन शिंदे उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search