Next
‘डिजिटल चतुर’चे डॉ. माशेलकरांच्या हस्ते प्रकाशन
प्रेस रिलीज
Monday, January 01, 2018 | 03:20 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ज्येष्ठ संगणकतज्ञ् डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘डिजिटल चतुर’ पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात शास्त्रज्ञ पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे प्रमुख विशाल सोनी उपस्थित होते. गेल्या दशकात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय चित्रे, धोरणे आणि समीकरणे पूर्ण बदलली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व उपग्रहीय संवादमाध्यमांचा फार मोठा वाटा आहे. ‘डिजिटल चतुर’ ही एक अशी व्यक्तिरेखा आहे की, जिला स्मार्ट फोन, संगणक, इंटरनेट यांचा वापर करणे जमले आहे.

प्रकाशन करताना प्रमुख पाहुणे डॉ. माशेलकर यांनी पुस्तकाच्या संकल्पनेचे स्वागत केले. ‘डिजिटल इंडिया’ कल्पनेचा सर्वांनी अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. ‘बहुविध क्षेत्रातील ऑनलाईन सेवांमुळे जीवन सुकर व सुसह्य झाले आहे. संगणक युगातील स्थित्यंतराचा आवाका व वेग प्रचंड आहे. अवघे जीवन व अवघे विश्व व्यापून टाकण्याची क्षमता त्यात आहे,’ असे ते म्हणाले.

डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, ‘स्मार्टफोन हा तुमचा सखा, मार्गदर्शक व सवंगडी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संगणक प्रणालीमुळे या क्षेत्रात क्रांतीच होणार आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. रोगाचे अचूक निदान कमी खर्चात व जलदगतीने त्यामुळे होईल. त्यामुळे रोगावरील उपचारांची परिणामकारकता वाढेल. दिव्यांग व्यक्तीही संगणकाच्या सहजसुलभ वापरामुळे परावलंबी जीवनापासून बहुतांशी मुक्त होतील व चांगले जीवन जगू शकतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search