Next
पुण्यात ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’
प्रेस रिलीज
Tuesday, June 12 | 04:45 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पुणे शहराला ‘ज्वेलरी हब’ बनविण्याबरोबरच सराफ व व्यापाऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने स्टायलस इव्हेंट्स इंडिया, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन आणि पुणे सराफ असोसिएशन यांच्यातर्फे चौथ्या ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो– २०१८’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १८ जून २०१८ या कालावधीत पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झीबिशन सेंटर येथे सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे,’ अशी माहिती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

हे प्रदर्शन सराफी व्यावसायिकांबरोबरच सराफी व्यापारी व सराफी व्यवसायाशी सबंधित असलेल्यांसाठी विनामूल्य खुले असून, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला आपले  जीएसटी प्रमाणपत्र आणि बिझनेस व्हिजीटिंग कार्ड दाखविल्यानंतरच प्रदर्शनाला प्रवेश मिळणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

पुणे सराफ असोसिएशनचे सचिव अमृतलाल सोळंकी, सहसचिव राजेंद्र वाईकर, खजिनदार कुमारपाल सोळंकी, स्टायलस इव्हेंट्सचे संचालक रणजीत शिंदे, श्रीकुमार के. पी. या वेळी उपस्थित होते.   

फत्तेचंद रांकारांका म्हणाले की, ‘पुणे सराफ असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन यांच्या सहकार्याने दरवर्षी हे प्रदर्शन भरविले जाते. प्रदर्शनाचे हे सलग चौथे वर्ष असून, यामध्ये जेम्स अॅंड ज्वेलरी व या संबंधित मशिनरीचे तब्बल ३२५ स्टॉल्स असणार आहेत. हे प्रदर्शन ‘बिझनेस टू बिझनेस’ अर्थात ‘बीटूबी’ स्वरूपात असणार असून, जगभरातील रत्ने आणि दागिन्यांचे प्रकार, त्यासाठी वापरात असलेले तंत्रज्ञान, विविध डिझाईन्स, ट्रेंड्स व्यापाऱ्यांना एकाच छताखाली पाहता येणार आहे.’

‘आज देशभरात दागिन्यांशी निगडीत अनेकविध प्रदर्शने होत असतात. ज्यामधून व्यापाऱ्यांना एक व्यासपीठ मिळत असते; पण राज्यात आणि त्यातही पुण्यात अशा प्रकारची प्रदर्शने होत नाहीत. हेच लक्षात घेत पुण्यासारख्या शहराला ‘ज्वेलरी हब’ बनविण्याच्या दृष्टिने आम्ही हे आगळेवेगळे प्रदर्शन आयोजित केले आहे. महाराष्ट्रातील लहान व मोठे सराफ सुवर्णकार तसेच महाराष्ट्राबाहेरील सराफ सुवर्णकार यांना या प्रदर्शनाच्या माधमातून एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा आमचा मानस आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

या प्रदर्शनात टेंपल ज्वेलरी, अॅन्टिक ज्वेलरी, जडाऊ, बिकानेरी, पोलकी वर्क्स, कुंदन, ठुशी, कंटेम्पररी, मंगळसूत्र, मशीन व हाताने निर्माण केलेल्या चेन, बांगड्या, रिंगा आणि नथ यांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील दागिन्यांची गरजेप्रमाणे विविध मशिनरी, नवीन टेक्नॉलॉजी, ज्वेलरी क्लस्टर व्यवसाय उभारण्याची योग्य ती माहिती यांबरोबरच सुरक्षा व सावधानीसाठी आवश्यक ती यंत्रे या प्रदर्शनामध्ये पाहता येणार आहेत.                        

‘युनिक जेम्स अॅंड ज्वेलरी इंटरनॅशनल शो– २०१८ या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील व्यापाऱ्यांना आम्ही एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून, व्यापार वृद्धीबरोबरच व्यापाऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील बदल लक्षात येण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होईल यात शंका नाही,’ असे मत ‘स्टायलस'चे संचालक रणजीत शिंदे यांनी व्यक्त केले.    

‘युनिक जेम्स अॅण्ड ज्वेलरी इंटरनॅशनल शो– २०१८’चे उद्घाटन पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका आणि एमराल्ड ज्वेल इंडस्ट्री इंडिया लि. चे व्यवस्थापकीय संचालक के. श्रीनिवासन यांच्या हस्ते होणार आहे.

प्रदर्शनाविषयी :
दिवस :
१६, १७, १८ जून २०१८
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी सहा
स्थळ : ऑटो क्लस्टर एक्झीबिशन सेंटर, पिंपरी-चिंचवड, पुणे 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link