Next
पाणी बचतीसाठी मीना ग्युली धावणार १०० मॅरेथॉन्स
सामाजिक बांधिलकी जपत ‘कोलगेट’ने या प्रवासाला दिले प्रायोजकत्त्व
प्रेस रिलीज
Wednesday, November 28, 2018 | 01:19 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली येथे धावताना मीना ग्युलीनवी दिल्ली : जागतिक स्तरावरील अॅथलिट व पाणीबचाव कार्यकर्त्या मीना ग्युली यांनी पाणी बचतीसाठी ‘रनिंग ड्राय’ या प्रवासाला सुरुवात केली असून, हे अभियान त्या जागतिक स्तरावर राबवत आहेत. चार नोव्हेंबर २०१८ रोजी न्यूयॉर्क मॅरेथॉनमध्ये सुरू झालेली ही मोहीम २३ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे पोहोचली आहे. भारतातील प्रवास गुडगाव, बवाल, अचरोल, जयपूर, किशनगढ, रैला, भिलवाडा, चित्तोडगढ, बंसवारा, दाहोद, बडोदा, भरुच, अंकलेश्वर, सुरत, नवसारी, बलसाड, ठाणे या मार्गाने करून ही मोहीम सहा डिसेंबर २०१८ रोजी मुंबईत पोहोचणार आहे.

ब्रश करताना पाण्याचा नळ बंद ठेवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड एक ब्रँड म्हणून बांधील असून, ‘एव्‍हरी ड्रॉप काउंटस्’ या तत्त्वावर ‘कोलगेट’चा विश्वास आहे. म्हणूनच पाणी बचावासाठी मीना यांचा सुरू असलेला हा प्रवास ‘कोलगेट’ने प्रायोजित केला आहे.

‘पाण्याचे दुर्भिक्ष्य ही जागतिक समस्या असून, पृथ्वीवरील प्रत्येकावर याचा परिणाम होत आहे. जागतिक स्तरावर चार अब्ज लोक वर्षातील किमान एक महिना पाणीटंचाईचा सामना करतात. दैनंदिन व्यवहारांत पाणी वाचवण्याच्या एका साध्या, पण प्रभावी उपायाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणाऱ्या ‘कोलगेट’सोबत काम करता येणे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,’ असे मीना यांनी सांगितले.

भारतात आल्यावर ‘कोलगेट’तर्फे मीना ग्युली यांचे स्वागत करण्यात आले.१०० दिवसांत १०० मॅरेथॉन्स मोहिमेचा भाग म्हणून मीना यांनी इंग्लंड, फ्रान्स, इटली, उझबेकिस्तान आणि अराल समुद्रात दौड पूर्ण केली आहे. भारतातील टप्प्यानंतर त्या हाँगकाँग, चीन, दुबई, जॉर्डन, इस्‍त्रायल, पॅलेस्टाइन, इथिओपिया, केनिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चिली, बोलिव्हिया, पेरु आणि मेक्सिको या देशांमध्ये धावणार आहेत. त्यानंतर त्या या मोहिमेदरम्यान अमेरिकेत धावणार आहेत आणि आपली १००वी मॅरथॉन न्यूयॉर्कमध्ये ११ फेब्रुवारी २०१९ रोजी पूर्ण करणार आहेत.

‘रनिंग ड्राय’ हे संपूर्ण जगाला पाणी वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आहे, असे स्पष्ट करताना मीना म्हणाल्या, ‘आपल्याला जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आवश्यक असे पाणी संपत चालले आहे. आम्ही याला ‘रनिंग ड्राय’ असे नाव दिले आहे, कारण आपण सामना करत असलेल्या संकटाची तीव्रता आम्हाला सर्वांना जाणवून द्यायची आहे. यासाठीच जगभरात १०० दिवसांत १०० मॅरथॉन धावण्याचा निर्णय मी घेतला. पाण्याप्रती १०० टक्के बांधिलकी कशी असते, हे मला यातून दाखवून द्यायचे होते.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link