Next
‘डीजनरेटिव्ह स्कोलिऑसिस’ग्रस्त रुग्णावर ‘रुबी’मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
प्रेस रिलीज
Wednesday, May 22, 2019 | 01:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘डीजनरेटिव्ह स्कोलिऑसिस विथ लंबर कॅनॉल स्टेनॉसिस’ने ग्रस्त असलेल्या एका ६० वर्षीय रुग्णावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. भूषण खेडकर यांच्या नेतृत्वाखाली या रुग्णावर कमीत कमी छेद वापरून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या व्याधीमध्ये चालता न येणार्‍या रुग्णाला आता चालता येऊ लागले आहे.

या विषयी माहिती देताना डॉ. खेडकर म्हणाले, ‘हे रुग्ण आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांना हालचाल करता येत नव्हती. त्यांच्या पायामधील संवेदना कमी झाल्या होत्या. स्नायू कमकुवत वाटत होते, पायात गोळे येत होते. वयोमानानुसार व्हर्टिब्रल कॅनॉल हे अरूंद होते आणि त्यामुळे पाठीतील नसा या दाबल्या जातात. डीजनरेटिव्ह लंबर स्टेनॉसिसची लक्षणे सामान्यत: वयस्कर लोकांमध्ये दिसून येतात आणि त्याच्याकडे लक्ष दिले नाही, तर ते गंभीर रूप धारण करू शकतात. अगदी गंभीर प्रकारात पाठीतील व्हर्टिब्रल कॅनॉलच्या संरचनेमध्ये बिघाड होतो आणि पाठीची विकृती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत नसांची जागा कमी होऊ शकते. वयस्कर लोकांमध्ये यामुळे झालेल्या मर्यादित हालचालीमुळे त्यांचा आत्मविश्‍वास कमी होऊ शकतो व निराशा वाढू शकते. यामुळे इतरांवर अवलंब देखील वाढू शकतो. त्याचबरोबर ऑस्टिओपोरॉसिस किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते. काही रुग्णांमध्ये पाय नीट उचलता येत नसल्याने (फूट ड्रॉप) घासत न्यावा लागतो आणि यामुळे लवकर थकवा येतो. मधुमेहासारखे आजार आधीपासून असतील, तर याची लक्षणे अधिक तीव्र होतात आणि जखमांना बरे होण्यास वेळ लागतो.’

‘याचे निदान वैद्यकीय तपासणी, डायनॅमिक एक्सरेज आणि एमआरआय स्कॅनद्वारे केले जाते. यावर उपाय हा सर्वसाधारणपणे शस्त्रक्रिया असते. सामान्यत: रुग्णाच्या स्थितीनुसार एंडोस्कोपीक लेझर असिस्टेड डीकाँप्रेशन किंवा मायक्रोस्कोपीक डीकाँप्रेशन या शस्त्रक्रिया केल्या जातात. या रुग्णाच्या बाबतीत लंबर कॅनॉल डीकाँप्रेशन व इन्स्ट्रुमेंटल फ्युजन शस्त्रक्रिया केली गेली, ज्यामुळे पाठीच्या नसांच्या मुळावरील दाब कमी होण्यास मदत झाली. मेटल इम्प्लांटसचा वापर करून व्हर्टिब्रल कॅनॉलमध्ये हाडांची वाढ होईस्तोवर त्यांना एकत्र ठेवण्यास मदत झाली. या शस्त्रक्रियेत अनेक जोखमी होत्या; मात्र न्युरोमॉनिटरचा वापर आणि शस्त्रक्रियेची अचुकता यामुळे चांगले परिणाम मिळतात.’

रुग्णाला आम्ही शस्त्रक्रिया झाल्याच्या दिवशीच वॉकरच्या साह्याने चालायला सांगितले आणि आता ते स्वतंत्रपणे चालू शकतात. अशा उपचाराचा मुख्य उद्देश्य हा रुग्णाची जास्तीत जास्त हालचाल पूर्ववत करणे हा असल्याचे डॉ. खेडकर यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search