Next
‘भारत फोर्ज’ने खरेदी केला ‘टेवा मोटर्स’मध्ये हिस्सा
प्रेस रिलीज
Monday, June 18, 2018 | 02:18 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारत फोर्ज लिमिटेडने टेवा मोटर्स (जर्सी) लिमिटेड या ‘यूके’तील चेल्म्सफर्ड येथे ऑपरेशन्स असलेल्या कंपनीमध्ये १० दशलक्ष पाउंड्स गुंतवणूक केल्याचे नुकतेच जाहीर केले.

कमर्शिअल व्हेइकल व बसेससाठी ‘टेवा’ ७.५-१४ टी वेट श्रेणीतील इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सोल्यूशन्स पुरवते. नवी व्यावसायिक वाहने, प्रामुख्याने ट्रक व बस यांच्या विकासासाठी लवकरच याचा विस्तार केला जाणार आहे. ‘टेवा’च्या आधुनिक, पेटंटेड सॉफ्टवेअर, प्रेडिक्टिव्ह रेंज एक्स्टेंडर मॅनेजमेंट सिस्टीमचा (प्रेम्स) वापर करून ही वाहने रेंज एक्स्टेंडरचे व्यवस्थापन सक्रिय व स्वायत्त पद्धतीने करतात. ज्यामुळे लो कार्बन झोन्स व शहरातील अन्य ठिकाणी केवळ इलेक्ट्रिक ड्राइव्ह वापरण्याची खात्री बाळगता येऊ शकते.

‘भारत फोर्ज’ गेली काही वर्षे इलेक्ट्रिक व्हेइकल क्षेत्रातील संशोधन व विकास आणि तंत्रज्ञानविषयक धोरण यावर काम करत आहे. ‘इव्ही’ क्षेत्रातला ‘भारत फोर्ज’चा तिसरा मोठा उपक्रम आहे आणि ‘यूके’तील मिरा येथील ‘इंजिनीअरिंग अँड डेव्हलपमेंट सेंटर’ सुरू झाल्यानंतर व भारतातील टॉर्क मोटरसायकल्स प्रायव्हेट लिमिटेडतील गुंतवणुकीनंतर लगेचच तो हाती घेण्यात आला.

या गुंतवणुकीच्या निमित्ताने, ‘भारत फोर्ज’ने ई-मोबिलिटी क्षेत्रातील संशोधन व विकास उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने भारतात ‘टेवा’ तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकरणासाठी परवानाही मिळवला आहे.

या गुंतवणुकीमुळे ‘भारत फोर्ज’ला तंत्रज्ञानविषयक ट्रेंड ओळखण्यासाठी आणि भारतातील व परदेशातील इलेक्ट्रिक मोबिलिटीसंबंधी सोल्यूशन सह-विकसित करण्यासाठी झपाट्याने वाढत्या ‘इव्ही’ मार्केटमध्ये आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी मदत होणार आहे. ओईएमच्या गरजांसाठी व त्यामुळे प्रति वाहन उत्पन्नात वाढ करण्यासाठी पूरक ठरण्याच्या दृष्टीने विविध उत्पादनांची निर्मिती करण्याचे ‘भारत फोर्ज’चे उद्दिष्ट आहे.

‘टेवा’ची स्थापना मुख्य कार्यकारी अधिकारी अशर बेनेट यांनी एंजेल को फंडातर्फे (ब्रिटीश बिझनेस बँकचा भाग) गुंतवणुकीसह चार वर्षांपूर्वी केली. कंपनी सध्या ‘यूके’मध्ये कार्यरत आहे. या वेळी बेनेट म्हणाले की, ‘भारत फोर्जबरोबर भागीदारी केल्याने आम्हाला प्रगतीविषयक उपक्रमांना चालना देण्यासाठी मदत होणार आहे; तसेच व्यावसायिक वाहनांच्या इलेक्ट्रिफिकेशनसाठी गरजेच्या असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या बाबतीत प्राथमिक टप्प्यात असलेल्या कोणत्याही देशामध्ये टेवाच्या वाहनांचे व सोल्यूशनचे स्वागत केले जाईल.’

‘टेवा’चे अध्यक्ष एडवर्ड हाम्स यांनी ‘भारत फोर्ज’च्या गुंतवणुकीचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘नव्या निधीमुळे टेवाला यूकेतील कार्याचा विस्तार करणे शक्य होईल व लंडन व लीड्स अशा शहरांतील झीरो एमिशन झोन्सच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ब्रिटनमध्ये इलेक्ट्रिकची संख्या वाढवण्यासाठी मदत होईल.’

या गुंतवणुकीविषयी ‘भारत फोर्ज’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, ‘यामुळे भारतातील व जगभरातील आमच्या ग्राहकांसाठी अतिशय योग्य व अद्ययावत पॉवरट्रेन सोल्यूशन सादर केले जाईल. टोर्क मोटरसायकल्स येथे सध्या सुरू असलेल्या कामाबरोबरच या गुंतवणुकीमुळे ‘भारत फोर्ज’ला टू-व्हीलरचे व कमर्शिअल व्हेइकल ‘इव्ही’ क्षेत्राचे अधिक आकलन करण्यासाठी मदत होईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search