Next
‘विद्यार्थ्यांनी कौशल्ये विकसित करून पाया भक्कम करावा’
फाटक हायस्कूलमधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा प्रा. बोडस यांच्या हस्ते सत्कार
BOI
Friday, August 24, 2018 | 05:01 PM
15 0 0
Share this article:

मनोगत व्यक्त करताना प्रा. उदय बोडस. व्यासपीठावर (डावीकडून) दाक्षायणी बोपर्डीकर, शुभांगी वायकूळ, अॅड. सुमिता भावे, अथर्व सुर्वे आणि किशोर लेले

रत्नागिरी :
  ‘विद्यार्थ्यांनी संधी मिळेल, तिथे वेगळ्या वाटा शोधायला हव्यात. जागतिक स्थिती पाहता ‘सायबर वॉर’साठी सज्ज होण्याच्या दृष्टीने ज्ञान मिळवून सज्ज व्हायला हवे. संगणकीय यंत्रणा बंद पडली तरी त्यावर उपाययोजना हवी. त्यासाठी कौशल्य विकसित करून पाया भक्कम करण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन प्राध्यापक उदय बोडस यांनी केले. रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमधील पाचवी व आठवीतील शिष्यवृत्ती मिळविलेल्या ३८ विद्यार्थ्यांचा सत्कार २४ ऑगस्ट २०१८ रोजी प्रा. बोडस यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

आठवीच्या शिष्यवृत्तीत शाळेत पहिला आलेल्या अथर्व सुर्वेचा सत्कार करताना प्रा. उदय बोडस.

या कार्यक्रमात व्यासपीठावर दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ, उपमुख्याध्यापक किशोर लेले, जिल्ह्यात दुसरा आलेला आठवीतील विद्यार्थी अथर्व सुर्वे आदी उपस्थित होते.

प्रा. उदय बोडस म्हणाले, ‘याच शाळेत माझा पाया भक्कम झाला. इथल्या शिक्षकांनी शिस्त लावल्याने अंगी काटेकोरपणा आला. आजच्या स्थितीत शिक्षकांनी मैत्रीपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना भावी स्पर्धेसाठी सज्ज केले पाहिजे. सध्या केरळमध्ये पूरस्थितीमुळे सर्व यंत्रणा कोलमडली आहे. अशी स्थिती उद्भवल्यास संपर्कासाठी काय करता येईल, याचा विचार व्हायला हवा. सायबर हल्ल्यासारख्या संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली तर मोठे नुकसान होईल. इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक हल्ले झाल्यास त्या वेळी काय करू शकतो, या दृष्टीने कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच सज्ज असले पाहिजे.’
 
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेत पहिला आलेल्या अद्वैत बर्वे याचा सत्कार करताना प्रा. उदय बोडस.

मुख्याध्यापिका वायकूळ यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचाही सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षक दिगंबर नाचणकर यांनी केले. गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.

मनोगत व्यक्त करताना अॅड. सुमिता भावे.

फाटक हायस्कूलचा शतक महोत्सव २०२२मध्ये
कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे म्हणाल्या, ‘फाटक हायस्कूलचा शतक महोत्सव २०२२मध्ये दिमाखदार पद्धतीने साजरा होणार आहे. शाळेत संगीत, चित्रकला, कथ्थकचे शिक्षण दिले जाते. जर्मन भाषा वर्गसुद्धा चालू करण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने सौरऊर्जेवर आधारित विद्युत सुविधा दिली जाणार आहे. फाटक हायस्कूलला एक नंबरची शाळा बनवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.’

(फाटक हायस्कूलमधील शिष्यवृत्ती मिळविलेल्या ३८ विद्यार्थ्यांची नावे आणि सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search