Next
घरोघरी
BOI
Monday, October 08, 2018 | 10:28 AM
15 0 0
Share this article:

‘घरोघरी मातीच्या चुली’ असे म्हणतात. गरीब-श्रीमंत असे कुणीही असले, तरी प्रत्येकाच्या घरातील कहाणी साधारण सारखीच असते. फक्त आपल्यापेक्षा ते कसे सुखी, त्यांना पैशाची ददात नाही, ही भावना सार्वत्रिक असते. हाच धागा माधुरी तळवलकर यांच्या ‘घरोघरी’ या कादंबरीतून दिसतो. उच्चभ्रू देवयानीच्या घरी जाऊन तिचा मसाज करणाऱ्या संगीताची ही कहाणी.

देवयानी पोतदारची बाल मैत्रीण कुमुद, देवयानीची वाहिनी अशा अनेक कुटुंबात ती मसाजसाठी जात असे. त्या-त्या कुटुंबातील कहाणी ऐकता-ऐकता संगीताची कथाही वाचकांसमोर उलगडत जाते. देवयानीचा अधिकार गाजवणारा स्वभाव, पती अजितबद्दल संशयी वृत्ती, कुमुदशी अबोला; पण तिचा पती चारुहासशी मैत्री टिकवण्याची धडपड, अजित व शिल्पाचे नाते अशा वेगवेगळ्या व्यक्तींमधील नाट्य रंगताना संगीता, तिचा पती मिलिंद यांच्या नात्यातील उडत चाललेले रंग, तिला चंद्रकांतची सतत येणारी आठवणही यातून डोकावत राहते. नात्यांच्या अशा वळणांमधून संसाराची जबाबदारी पेलताना होणारी ओढाताण व त्यातूनही स्वतःचे व्यक्तित्व जपण्याचे प्रयत्न करणाऱ्या बुद्धिमान व संवेदनशील संगीताची ही संघर्षकहाणी उत्कंठावर्धक आहे.     

प्रकाशक : राजेंद्र प्रकाशन
पाने : १५०
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search