Next
‘सप’च्या मैदानावर तीन हजार विद्यार्थ्यांची योग प्रात्यक्षिके
BOI
Friday, June 21, 2019 | 01:12 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त शि. प्र. मंडळी, दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर योग प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात सुमारे तीन हजार विद्यार्थी, शिक्षक व सीए इन्स्टिट्यूट सहभागी झाले होते.

या वेळी शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शि. प्र. मंडळी संचालित सर्व शाळांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. पतंजली योग समितीचे प्रितेश केले यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली. 


‘योग दिवस जगभर साजरा होत आहे. आपले आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी रोज योगाभ्यास केला पाहिजे. आजचा दिवस त्यासाठी प्रोत्साहित करत असतो,’ असे अॅड. जैन या वेळी म्हणाले.

‘आयसीएआय’तर्फे सीए, विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी फडके संकुल येथेही योगवर्गाचे आयोजन केले होते. हा योगवर्ग एक ते ३० जून या कालावधीत होत असल्याचे अभिषेक धामणे यांनी सांगितले. योग दिवसाच्या निमित्ताने शि. प्र. मंडळींच्या सहयोगाने तीन हजार विद्यार्थ्यांसाठी योग्य प्रात्यक्षिके आयोजिण्याची संधी मिळाली. सर्वांसाठी चटई आणि लाडू वाटप केल्याचे ऋता चितळे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search