Next
सलमान खान ‘अॅप्पी फिझ’चा नवीन चेहरा
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 03:52 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पार्ले अॅग्रो’ या भारतातील सर्वांत मोठ्या शीतपेय कंपनीने, १५ मार्च रोजी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याची नियुक्ती त्यांच्या ‘अॅप्पी फिझ’ ब्रँडचा चेहरा म्हणून करत असल्याची घोषणा केली. यामुळे आता कंपनीला हा विभाग वेगाने वाढवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उन्हाळा वाढत असतानाच, सलमान आपल्यासाठी भारतातील पहिले स्पार्कलिंग फ्रूट ज्युस ड्रिंक असलेल्या अॅप्पी फिझ साठी, ‘#फिल द फिझ’ ही मोहीम घेऊन आला आहे.

२००५मध्ये सुरूवात झाल्यापासून सहाशे ५० कोटी रूपयांचा व्यवसाय करून, फ्रुट प्लस फिझ ड्रिंक विभागात, हा बाजारपेठेतील आघाडीचा घटक बनला आहे. सलमान खान बरोबरचे हे सहकार्य अॅप्पी फिझच्या मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूकीच्या योजनेचा एक भाग असून, यामुळे संपूर्ण भारतातील कोट्यापवधी ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचणे शक्य होईल. या ब्रँडने बिग बॉस सिझन ११ बरोबर नुकत्याच केलेल्या सहकार्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पार्ले अॅग्रोने शो बरोबर सहकार्य करून, स्पेशल एडिशन अॅप्पी फिझ पेट बॉटल आणली होती परिणामी फॅन्सना त्यांच्या आवडत्या हिरोला भेटण्याची संधी मिळाली होती.

या घोषणे विषयी अधिक माहिती देतांना पार्ले अॅग्रोच्या जॉइंट एमडी आणि सीएमओ नादिया चौहान म्हणाल्या, ‘अॅप्पी फिझने गेल्या काही वर्षांपासून बाजारपेठेवर चांगली पकड मिळवली आहे आणि या भागीदारीमुळे, आम्ही बाजारपेठेत सकारात्मक उपक्रम राबवून ब्रँड आणखी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.  सलमान खानचे आकर्षक व्यक्तिमत्त्व हे ब्रँडच्या ओळखीशी मिळतेजुळते आहे. त्याच्या प्रसिध्दीचा उपयोग तसेच, अॅप्पी फिझची शक्ती यामुळे आम्ही ब्रँडची घरगुती ओळख आणखी वाढवू इच्छितो.’

या भागीदारीविषयी बोलतांना सलमान खान म्हणाला, ‘अॅप्पी फिझचा ब्रँड अॅम्बेसेडर झाल्याचा मला आनंद आहे. या नव्या आकर्षक मोहिमेमुळे फॅन्स आणि ब्रँडचा फिझ दोघांनाही सकारात्मकता वाटेल, याबाबत मी उत्साही आहे.’

सलमान खानच्या या नवीन भागीदारीमुळे आता पार्ले अॅग्रोच्या ब्रँडसाठी ए विभागात आणखी एक भागीदारी बनली आहे. फ्रूटी आणि अन्य ब्रँडसाठी आलिया भट्ट, तर दक्षिण भारतातील टॉलिवूड सुपरस्टार अल्लू अर्जुन फ्रूटी करता ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. यांत आता सलमान खानची भर पडली आहे. बॉलिवूडमधील हा सुपरस्टार अॅप्पी फिझच्या नवीन जाहिरातीत झळकणार तर आहेच; पण त्याचबरोबर या उन्हाळ्यात सुरू होणाऱ्या मल्टीमिडिया मोहिमेतही आपल्याला दिसणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link