Next
प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत प्रतीक्षालयाची उभारणी
प्रेस रिलीज
Monday, December 17 | 03:50 PM
15 0 0
Share this story



पुणे : खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे प्रतीक्षालय कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाचा लोकार्पण सोहळा १५ डिसेंबर २०१८ रोजी शिरोळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

या वेळी गृहविभागाचे सहसचिव सोवितकार, प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. के. व्ही. कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तेलंग, ओएसडी धनंजय देशमुख, फूड कोर्पोरेशन ऑफ इंडियाचे सदस्य राम म्हेत्रे आणि रेल कमिटीचे सदस्य प्रतुल जागोडे आदी मान्यवर उपस्थित होते.   



प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत प्रतिक्षालय असावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे केली जात होती. याची दखल घेऊन शिरोळे यांनी खासदार स्थानिक विकास निधीमधून रुपये २० लाखांची मदत केली होती. या प्रतिक्षालयाचे काम आता पूर्ण झाले असून, याचे लोकार्पण करण्यात आले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link