Next
‘पारितोषिके यशप्राप्तीसाठी अधिक बळ देणारी ठरतात’
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, July 23, 2019 | 11:29 AM
15 0 0
Share this article:


कोल्हापूर : ‘पदवी, पारितोषिक मिळते त्यावेळेस आपल्याला फार मोठ्या संधीचे अवकाश प्राप्त झालेले असते. यश प्राप्त करण्यासाठी हीच पारितोषिके बळ देणारी ठरतात,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५५व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी पारितोषिके व स्मृतिचिन्हे प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारमतीत आयोजित या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.


कुलगुरू म्हणाले, ‘जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक समस्या पुढे येत असतात. त्यावर मात करण्याची दृष्टी आपल्याला विकसित करता आली पाहिजे. समस्यांपेक्षा उपायांवर चर्चा केलेली अधिक चांगले, त्यामुळे आणखीन एक संधी निर्माण होते. समाजापुढे जबाबदार नागरिक म्हणून गेल्यास शिवाजी विद्यापीठाच्या नावलौकिकामध्ये भर पडणार आहे. यासाठी सामाजिक जीवनामध्ये वावरताना शब्दाची जाण, दिशेचे भान आणि वडीलकीचा मान ठेवल्यास जबाबदार आणि आदर्श नागरिक निर्माण होतील. स्वत:मधील क्षमता विकसित करताना तुलनेच्या चक्रात पडण्यापेक्षा आत्मविश्वास, आणि विविध कौशल्यांचे बळ प्राप्त केल्यास निश्चित यश प्राप्त होते.’

या वेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ९१ पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी केले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. या वेळी विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search