Next
‘फिनोलेक्स’ व ‘मुकुल माधव’कडून ‘ससून’ला दोन कोटींचे अर्थसाह्य
प्रेस रिलीज
Thursday, April 11, 2019 | 02:42 PM
15 0 0
Share this article:

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्याकडून ससून सर्वोपचार रुग्णालयाला दोन कोटी रुपयांच्या अर्थसाह्यातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देण्यात आली आहेत. १६ एप्रिल २०१९ रोजी नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या (एनआयसीयू) दुसऱ्या, तर एंडोस्कोपी युनिटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या अद्ययावत यंत्रणेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.

एंडोस्कोपी युनिट आणि ‘एनआयसीयू’ या विभागात ही अद्ययावत यंत्रणा बसविण्यात येत आहे. एंडोस्कोपी युनिटमध्ये किरणांपासून बचावासाठी अल्ट्रा साउंड विथ हेड प्रोटेक्शन, थायरॉइड शिल्ड, लीड अॅप्रॉन, प्रोटेक्टिव्ह आय गिअर्स, ओजिडी स्कोप आदी उपकरणांचा, तर ‘एनआयसीयू’मध्ये क्रिटिकूल, अत्याधुनिक सेंट्रल एअर प्रेशर, दोन, सिपाप, ब्लड गॅस अॅनालायझर, ब्रेन अॅनालायझर या उपकरणांचा समावेश आहे. एप्रिल २०१७मध्ये ५९ खाटांचे ‘एनआयसीयू’ युनिट, तर मार्च २०१८मध्ये एंडोस्कोपी युनिट सुरू करण्यात आले आहे.

‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ आणि ‘मुकुल माधव फाउंडेशन’चे ध्येय जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हे आहे. ससून रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सर्व सोयींनी युक्त असे तीन सुसज्ज विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत. समविचारी लोकांच्या मदतीने फाउंडेशनतर्फे १० लाख रुपयांच्या निधीतून आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशा प्रकारचे दंतचिकित्सा करणारे हे पहिलेच शासकीय रुग्णालय आहे. डायबेटीस, यकृत प्रत्यारोपण आणि नेत्रोपचार सेवा देण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. ‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव फाउंडेशन’ २०१२ पासून ससून रुग्णालयांशी जोडले गेले असून, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील गरजू मुलांना अर्थसाह्य केले जात आहे. १०० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही उभारण्यात आली आहे.

रितू प्रकाश छाब्रियाया विषयी बोलताना फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, ‘केवळ उपक्रमांना अर्थसाह्य देऊन आम्हाला थांबायचे नाही. पैसे दिले आणि आमची जबाबदारी संपली अशा स्वरूपात आम्ही काम करत नाही. समाजाला चांगल्या आरोग्य सुविधा अल्पदरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्याकडे असलेल्या यंत्रणेमार्फत समाजाच्या नेमक्या गरजा ओळखून त्यानुसार त्यावर काम करीत आहोत. ‘एनआयसीयू’मुळे गेल्या दोन वर्षांत पाच हजार २०० बाळांना जीवदान दिल्याचा, तर ‘एंडोस्कोपी’मार्फत केवळ साडेतीनशे ते एक हजार १५० रुपयांत उपचार देण्यात यश आले, याचा आनंद आहे.’

ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘पहिल्यांदाच शासकीय रुग्णालय आणि उद्योगसमूह यांच्या संयुक्त प्रयत्नातून असा एक चांगला उपक्रम सुरू झाला. आज ससून रुग्णालयाला समाजाकडून अर्थसाह्य मिळत आहे. त्यामुळे येथील उपचार अत्याधुनिक होत आहेत. सर्वसामान्यांना परवडतील अशा अनेक शस्त्रक्रिया येथे होऊ लागल्या आहेत. ‘ससून फॉर कॉमन मॅन’ ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून, सामान्यांसाठी ससून रुग्णालय आधार बनत आहे. ससून रुग्णालय अधिकाधिक लोकाभिमुख आणि लोकप्रिय होत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search